23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारण‘आप’चा काँग्रेसला दिल्लीतील तीन जागांचा प्रस्ताव!

‘आप’चा काँग्रेसला दिल्लीतील तीन जागांचा प्रस्ताव!

गुजरातमधील दोन तर हरयाणातील एका जागेची मागणी

Google News Follow

Related

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विशेषतः दिल्ली आणि पंजाबमधील जागांसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षात बंद दाराआड जागावाटपासंदर्भात चर्चा झाली.बैठकीला मुकुल वासनिक, अशोक गेहलोत या ज्येष्ठ काँग्रेसनेत्यांसह जागावाटपासंदर्भातील समितीचे सदस्यही उपस्थित होते. तर, आपच्या वतीने राज्यसभेचे खासदार संदीप पाठक आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी बैठकीत काय घडले, याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली नाही.

मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपने काँग्रेसला दिल्लीतील तीन जागांचा प्रस्ताव दिल्याचे समजते. तसेच, गुजरात, हरयाणा आणि गोव्यामधील काही जागांबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपला गुजरातमध्ये एक, हरयाणात तीन आणि गोव्यात एक जागा हवी आहे. याबाबत पुढील बैठक लवकरच होईल. तर, पंजाबमधील सत्ताधारी ‘आप’ने काँग्रेसला सहा जागा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र पंजाबमधील काँग्रेसचे नेते मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘आप’शी हातमिळवणी करण्यास तयार नाहीत.

हे ही वाचा:

संरक्षणापासून आरोग्यापर्यंत… भारताने मालदीवशी नेहमीच पाळला शेजारधर्म!

मालदीवप्रकरणी चीनने खुपसले नाक

उरी हल्ल्यातील आयएसआयच्या भूमिकेवरून अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले

रामजन्मभूमीचे टाळे उघडून देणाऱ्या न्यायाधीशांना पाकमधून येत असत धमक्या

मात्र बैठकीनंतर मुकुल वासनिक यांनी काँग्रेस आणि आप एकत्र निवडणूक लढवून भाजपचा पराभव करतील, असा निर्धार व्यक्त केला आहे. ‘चर्चेदरम्यान काय घडले हे उघड करणे योग्य नाही. त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही आधीच घेतला आहे. काँग्रेस आणि आप हे इंडिया गटाचा महत्त्वाचा भाग आहेत,’ असे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा