हरभजन सिंग, राघव चड्डा जाणार राज्यसभेत

हरभजन सिंग, राघव चड्डा जाणार राज्यसभेत

पंजाबी मध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने राज्यसभेसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यात पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच समजतील काही प्रतिष्ठित चेहऱ्यांना राज्यसभेत पाठवण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे आम आदमी पक्षाचा विस्तार समाजाच्या विविध स्तरांमध्ये होण्यासही मदत होणार आहे.

यामध्ये आम आदमी पक्षाचे युवा आमदार आणि पंजाबचे सहप्रभारी असलेले राघव चड्डा, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक, लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे कुलगुरू अशोक मित्तल या नावांचा समावेश आहे. तर कृष्णा प्राण कँसर केअर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संजीव अरोरा यांनाही संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

हिजाब निर्णयाला विरोध करणाऱ्या विद्यार्थीनींना प्रयोग परीक्षेची संधी नाही

… म्हणून इम्रान खान यांनी केलं भारताचं कौतुक

नवाब मलिकांना बेड, खुर्ची वापरण्याची मुभा; आता ४ एप्रिलपर्यंत कोठडी

तेलंगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध! दगडफेकीनंतर जमावबंदी लागू

अशोक मित्तल हे लव्हली प्रोफेशनल विद्यापिठाचे संस्थापक आहेत. ते आणि संदीप पाठक हे शैक्षणिक क्षेत्रातील दोन मोठी नावे मानली जातात. तर अपेक्षेप्रमाणे फिरकीपटू हरभजन सिंग याचीही आता राजकीय इनिंग सुरु होणार आहे. हरभजन सिंग याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो राजकीय क्षेत्रात पदार्पण करेल अशी चर्चा होती. काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्याचव्ही भेटही घेतली होती. पण हरभजनने आपची ऑफर स्वीकारता राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाने पाशवी बहुमत मिळवले आहे. त्यामुळे आपचे हे पाचही उमेदवार विजयी होणार आहेत. सोमवार, २१ मार्च रोजी राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख असून आपच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

Exit mobile version