संसदेच्या पावसाळी सत्रातून ‘आप’ खासदार संजय सिंग निलंबित

सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी केली कारवाई

संसदेच्या पावसाळी सत्रातून ‘आप’ खासदार संजय सिंग निलंबित

आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. गैरवर्तनाबद्दल इशारा देऊनही त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही त्यामुळे राज्यसभेच्या सभापतींनी हा निर्णय घेतला. आम आदमी पक्षाचे नेते या पावसाळी अधिवेशनात यापुढे सहभागी होऊ शकणार नाहीत, असे सभापतींनी जाहीर केले.

उपराष्ट्रपती आणि सभापती धनखड यांनी गेल्या आठवड्यात संजय सिंग यांना इशारा दिला होता. केंद्र सरकारकडून आणल्या जाणाऱ्या विधेयकाविरोधात सातत्याने सभागृहात गोंधळ घालत असल्याबद्दल सभापतींनी हा इशारा दिला होता. पण त्यांच्या वर्तनान सुधारणा झाली नाही. धनखड यांनी संजय सिंग यांना आधी विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या जागी बसावे असे म्हटले होते पण संजय सिंग हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचा निर्णय सभापतींनी घेतला.

केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांनी संजय सिंग यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला. सिंग यांचे वर्तन हे नैतिकतेला आणि सभागृहाच्या नियमांना धरून नाही, असे म्हणत हा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यामुळे सरकार संजय सिंग यांना या अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. सभापती धनखड यांना ही विनंती गोयल यांनी केली.

हे ही वाचा:

दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाने सुरू होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांची पाटी कोरी, १८ जणांचे पथक जाणार

चांदेरे फौडेशन, राजमाता जिजाऊ संघ सतेज करंडकाचे मानकरी

‘हेअरकट’मुळे वाढली डोकेदुखी

धनखड यांनी सभागृहाची परवानगी घेत संजय सिंग यांच्यावर ती कारवाई केली. आवाजी मतदानाने ही विनंती मान्य करण्यात आली. त्यानंतर धनखड यांनी सभागृह तहकूब केले. तरीही विरोधी पक्षांकडून गोंधळ घालणे सुरूच होते.

यासंदर्भात आम आदमीचे खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, राज्यसभेच्या सभापतींनी संजय सिंग यांना निलंबित केले हे दुर्दैवी आहे. लोकशाहीच्या हे विरोधी आहे. सभागृह तहकूब केल्यावर आम्ही सभापतींकडे गेलो आणि त्यांना निलंबनाची ही कारवाई मागे घेण्याची विनंती केली.

Exit mobile version