आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंग यांना दिलासा मिळाला आहे. संजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संजय सिंग यांच्याकडून जामीनासाठी केलेल्या अर्जाला ईडीने कसल्याचं प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं नसल्याने न्यायालयाने हा निर्णय घेत सिंग यांचा जामीन मंजूर केला आहे.
राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती. हे प्रकरण दिल्लीतील मागे घेतलेल्या अबकारी धोरणाशी संबंधित होते. ईडीने संजय सिंह यांच्या जामीनाला विरोध केला नाही, त्यामुळे न्यायालयाने सिंह यांचा जामीन मंजूर केला. २०२१- २२ च्या दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात संजय सिंग यांना ईडीने अटक केली होती. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यानंतर या प्रकरणाशी संबंधित संजय सिंगांना अटक झाली होती. सर्वोच्च न्यायालयात संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
खंडपीठाने ईडीला विचारले होते की, संजय सिंह यांना अजूनही तुरुंगात ठेवण्याची गरज का आहे? संजय सिंग यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, मनी लाँड्रिंगची पुष्टी झालेली नाही आणि मनी ट्रेल देखील सापडलेला नाही. असे असतानाही संजय सिंह ६ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. अखेर मंगळवारी ईडीने त्यांच्या जामीनाला कोणताही आक्षेप घेतला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान ईडीने पीएमएलए कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत चौकशी सुरू असताना संजय सिंग यांना जामीन देण्यास हरकत नसावी, असे सांगितले. जामीनाच्या अटी काय असाव्यात? हे सत्र न्यायालयात ठरविण्यात येणार आहे. जामीन मिळाल्यानंतर संजय सिंह राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
‘इंडी’ गटात सावळा गोंधळ; जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीच्या बालेकिल्ल्यातून नॅशनल कॉन्फरन्सचा उमेदवार
पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ४३ लाख रुपयांचे बक्षीस असणारे दोन नक्षलवादी ठार!
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी दिले आव्हान, ‘आधी त्या भारतीय साड्या पेटवा!’
अन्सारीच्या मृत्यूनंतर तुरुंग अधीक्षकाला जीवे मारण्याची धमकी!
मद्य धोरण प्रकरणी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. सध्या ते तिहार जेलमध्ये आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आपचे आणखी नेते अटक होतील, अशी भीती मंत्री आतिशी यांनी व्यक्त केली आहे.