25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणआम आदमी पार्टीच्या हरभजनसिंग यांनी ममतांना विचारला तिखट सवाल

आम आदमी पार्टीच्या हरभजनसिंग यांनी ममतांना विचारला तिखट सवाल

कोलकात्यातील बलात्कार प्रकरणावर लिहिले पत्र

Google News Follow

Related

भारताचा माजी फिरकीपटू आणि आम आदमी पक्षाचे खासदार हरभजनसिंग यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणासंदर्भात घणाघाती टीका केली आहे. हरभजन यांनी पाठविलेल्या दोन पानी पत्रात त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका केली आहे. या पीडित मुलीला न्याय मिळण्यात अक्षम्य दिरंगाई होत असल्याबद्दल हरभजन यांनी चिंता प्रकट केली.

अर्थात, ही घटना घडल्यानंतर हरभजन यांचे हे पत्र आठवड्याभराने लिहिले गेले असले तरी त्यात म्हटले आहे की, या घटनेमुळे स्त्रियांच्या प्रतिष्ठेलाच तडा गेला आहे. हे घृणास्पद कृत्य केवळ एका तरुणीवरील झालेले नाही तर समूळ स्त्रीजातीच्या प्रतिष्ठेला अपमानित करणारे आहे. आपल्या समाजात ज्या विकृती लपलेल्या आहेत, त्याचे प्रतिबिंब म्हणून या घटनेकडे पाहता येईल. यासंदर्भात संबंधित संस्थांनी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

हे पत्र हरभजन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बंगालचे राज्यपाल आनंदा बोस आणि भारतीय नागरिकांना उद्देशून लिहिले आहे.

हरभजन यांनी म्हटले आहे की, हे सगळ्यात वाईट आहे की, एका वैद्यकीय संस्थेत ही घटना घडली आहे. ज्या वास्तूमध्ये लोकांच्या वेदना दूर केल्या जातात, त्यांचे जीव वाचवले जातात, त्याच ठिकाणी एका तरुणीचा वेदनादायी मृत्यू झाला आहे. एक आठवडा या घटनेला लोटला असला तरी अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच शेवटी डॉक्टरांना रस्त्यावर उतरावे लागले आहे.

हे ही वाचा:

ओमर अब्दुल्ला म्हणतात, ‘निवडणुकीनंतर आम्ही कलम ३७० रद्द करण्याचा ठराव मांडू’

ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करणाऱ्या विद्यार्थ्यालाही सोडले नाही

मुंबई विमानतळावरून ४ कोटी ८३ लाखांचे कोकेन जप्त !

नाशिक ते कानपूर; जिहादचा ताजा अंक

हरभजन यांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, डॉक्टरांची भावना समजण्यासारखी आहे. मी या सगळ्या आंदोलकांच्या पाठीशी आहे. आधीच सगळी डॉक्टर मंडळी आणि इतर कर्मचारी हे प्रचंड कष्ट उपसत आहेत. त्यात अशा घटना घडत असतील तर त्यांनी त्या परिस्थितीतही चांगले कार्य करावे अशी अपेक्षा आपण कशी काय बाळगू शकतो?

हरभजनसिंग यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि सीबीआयकडून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्यात यावा अशी मागणी केली आहे. आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे इंडी आघाडीतील सदस्य आहेत. मात्र तरीही हरभजनसिंग यांनी ही टीका केली आहे. दुसरीकडे इंडी आघाडीतील अनेक सदस्य ममता बॅनर्जींवर किंवा या प्रकरणावर बोलण्यासही कचरत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा