आम आदमी पक्षाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान

आम आदमी पक्षाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साऱ्या देशभर उत्साहात साजरी होत असताना दिल्लीच्या सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून मात्र सावरकर यांचा अपमान करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणत त्यांचा अपमान केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून आमदार महोदयांनी हा खोटा प्रचार चालवला आहे. पण सावरकरांच्या या अपमानामुळे नेटकऱ्यांचा तीव्र संताप झाला असून आम आदमी पक्षाच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून लढणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गेल्या काही वर्षापासून जाणीवपूर्वक बदनामी होत आहे. तशा अनेक घटना समोर येत आहेत. अंदमानमध्ये बंदी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची मुक्तता व्हावी अशी याचिका सावरकरांनी ब्रिटिशांकडे केली होती. कैद्यांचा तो अधिकार असतो. त्यानुसारच कायदेपंडित असणाऱ्या सावरकरांनी याचिका केल्या होत्या. त्या कुठेच वैयक्तिक स्वरूपाच्या नसून सर्व कैद्यांसाठी म्हणून एकत्रितपणे केल्या गेलेल्या होत्या. पण त्याला माफीनामा किंवा माफीपत्र म्हणत सावरकरांची बदनामी करण्याचे खोडसाळ प्रकार काही लोकांकडून जाणीवपूर्वक केला जातात. यात माध्यमातील काही घटकांपासून ते काही राजकीय पक्षांचे पुढारी ही अग्रणी असतात.

हे ही वाचा:

सावरकर आणि ज्यू नि इस्राएल

राजे, तुम्हाला मराठा आरक्षणाचा ठेका दिलेला नाही

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

महिना लोटला, पालिकेच्या स्वप्नातील ऑक्सिजन प्रकल्प गेले कुठे?

शुक्रवार, २८ मे अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी आम आदमी पक्षाच्या एका आमदारांनी त्यांची बदनामी केल्याचे समोर आले आहे. आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी ट्विटरवर सावरकरांना माफीवीर म्हणत त्यांचा अपमान केल्याची घटना समोर आली आहे. यावरून आम आदमी पक्षावर सडकून टीका केली जात आहे.

Exit mobile version