“वैयक्तिक फोटो लीक करून खच्चीकरण करण्याचं काम आप नेत्यांना दिलंय”

स्वाती मालीवाल यांचा धक्कादायक खुलासा

“वैयक्तिक फोटो लीक करून खच्चीकरण करण्याचं काम आप नेत्यांना दिलंय”

आम आदमी पार्टीच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना करण्यात आलेल्या मारहाणी प्रकरणात ‘आप’ पक्षाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. स्वाती मालीवाल यांना मारहाण करण्याचा आरोप असलेल्या अरविंद केजारीवालांच्या माजी पीए विभव कुमारला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता स्वाती मालीवाल यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात मोठे खुलासे केले आहेत.

स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की, स्वातीच्या विरोधात वाईट बोलण्याचा कसा प्रत्येकावर खूप जास्त दबाव आहे. तिचे वैयक्तिक फोटो लीक करून तिचं खच्चीकरण करायचं आहे. याशिवाय जो कोणी तिला पाठिंबा देईल त्याला पक्षातून काढून टाकलं जाईल. कुणाला पत्रकार परिषद घेण्याची तर कुणाला ट्विट करण्याचं काम मिळालं आहे. अमेरिकेत बसलेल्या स्वयंसेवकांना फोन करून माझ्याविरुद्ध काहीतरी पुरावे शोधणं हे काम दिलं आहे,” असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या आहेत की, “तुम्ही हजारोंची फौज उभी करा, मी एकटी याला सामोरी जाईन कारण सत्य माझ्या पाठीशी आहे. माझ्या मनात त्यांच्याविरुद्ध कोणतीही नाराजी नाही. आरोपी खूप शक्तीशाली व्यक्ती आहे. मोठ मोठे नेतेही त्याला घाबरतात. त्याच्या विरोधात भूमिका घेण्याची कोणाची हिंमत नव्हती. मला कोणाकडून काही अपेक्षाही नाही. दिल्लीच्या महिला मंत्री एका जुन्या महिला सहकाऱ्याचे चारित्र्य कसे हसत-हसत हरण करत आहेत, हे पाहून वाईट वाटलं. मी माझ्या स्वाभिमानासाठी लढा सुरू केला आहे, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहीन. या लढ्यात मी पूर्णपणे एकटी आहे पण मी हार मानणार नाही,” असा ठाम विश्वास स्वाती मालीवाल यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

उजनी धरण पात्रात बोट उलटून सहा जणांना जलसमाधी!

‘भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत, उर्वरित दोन टप्प्यांत ४०० ओलांडणार’

पुणे गाडी अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध?

भाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!

स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणी पीए विभव कुमार याला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version