निवडणूक तिकिटासाठी आपच्या नेत्यांनी मागितले तीन कोटी

आपच्या इच्छुक उमेदवाराचा आरोप

निवडणूक तिकिटासाठी आपच्या नेत्यांनी मागितले तीन कोटी

दिल्लीच्या महानगर पालिकेचे तिकीट न मिळाल्यामुळे आपचा नेता आंदोलनासाठी थेट ट्रान्समीटरवर चढला होता. त्याच्या या कारनाम्यामुळे पोलिसांची पळता भुई झाली होती. मात्र, अथक प्रयत्नांनी त्याला खाली उतरवण्यात आले आहे. परंतु त्याने आप निवडणुकीच्या तिकिटांबद्दल एक वेगळाचं खुलासा केला आहे. तिकीट देण्यासाठी ‘आप’ माझ्याकडून तीन कोटी रुपयांची मागणी करत आहे, असं या नेत्याने सांगितलं आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) माजी नगरसेवक हसीब-उल-हसन रविवारी दुपारी उमेदवारीचे तिकीट मिळाले नाही म्हणून ट्रान्समीटरवर चढले होते. याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. हसन यांना ट्रान्समीटरवरून खाली उतरवण्यात आले. खाली उतरल्यानंतर हसन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, तिकीट देण्यासाठी ‘आप’ माझ्याकडून तीन कोटी रुपयांची मागणी करत आहे. पक्षाला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे माझे तिकीट एका गुंडाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच हसन पुढे म्हणाले, मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे. जर तुम्ही लोक आला नसता तर आपचे नेते संजय सिंह, दुर्गेश पाठक, आतिशी यांनी माझे कागदपत्र कधीच परत केले नसते. पक्ष मीडियाला घाबरला आहे . संजय सिंह, दुर्गेश पाठक आणि आतिशी हे तिघेही भ्रष्ट आहेत. त्यांनी दोन ते तीन कोटी रुपयांना तिकिटे विकली आहेत, असा आरोप आपवर हसन यांनी केला आहे.

हे ही वाचा:

तिकीट न मिळालेला आपचा नेता चढला ट्रान्समीटरवर

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल

टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू

दोन विमाने हवेतच एकमेकांवर आदळली आणि उसळला आगीचा डोंब

दरम्यान, आम आदमी पक्षाने शनिवारी ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीसाठी ११७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

Exit mobile version