31 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारणगुजरातमध्ये 'आप' नेता बनला अन्नामलाई, स्वतःला मारले पट्ट्याचे फटके

गुजरातमध्ये ‘आप’ नेता बनला अन्नामलाई, स्वतःला मारले पट्ट्याचे फटके

आम आदमी पक्षाचे नेते गोपाल इटालिया यांनी केले निदर्शन

Google News Follow

Related

आम आदमी पक्षाचे नेते गोपाल इटालिया यांनी गुजरातमधील सुरत येथील जाहीर सभेत न्यायाची मागणी करत स्वतःला बेल्टने फटके मारून घेतले. गुजरातमधील विविध प्रकरणातील पीडितांना न्याय मिळाला नसल्याने आणि लोकांना जागृत करण्यासाठी म्हणून इटालिया यांनी स्वतःला बेल्टचे फटके मारले. मात्र, त्यांची ही कृती म्हणजे तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांच्या कृतीची केलेली नक्कल असल्याची चर्चा केली जात आहे. के. अन्नामलाई यांनी तामिळनाडूच्या द्रमुक सरकारच्या विरोधात स्वतःला चाबकाने फटके मारून निदर्शन केलं होतं. तसाच प्रयत्न आप नेत्याने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सुरतमधील एका सभेत भाषण करत असताना गोपाल इटालिया यांनी भाजपवर टीका केली. गोपाल इटालिया यांनी आपल्या भाषणात बोटाद लट्ठा कांड, मोरबी पूल अपघात, हरणी कांड, तक्षशिला अग्निकांड, राजकोटमधील गेमझोन दुर्घटना आणि दाहोद व जसदनमधील बलात्कारांच्या घटनांवर भाष्य केलं. इतक्या घटना घडूनही पीडितांना अद्याप न्याय मिळत नसल्याचे गोपाल इटालिया म्हणाले. तसेच न्याय देण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी स्वतःला बेल्टचे फटके मारले. त्यांनी स्वतःला बेल्टने मारहाण करून अन्यायाविरोधात जनतेला जागे होण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा..

पुराव्यांशी छेडछाड कराल तर याद राखा, म्हणत आसाराम बापूला ‘वैद्यकीय जामीन’

इंटरपोलप्रमाणे भारताचा आता ‘भारतपोल’; नवे पोर्टल कसे करणार काम?

नागपुरात एचएमपीव्हीची दोन मुलांना लागण

समाजसुधारक वाल्मिक कराडची पाच वाइनची दुकाने, प्रत्येक दुकानाचा बाजार भाव ५ कोटीच्या घरात!

काही दिवसांपूर्वीचं तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी तामिळनाडूच्या द्रमुक सरकारच्या विरोधात स्वतःला चाबकाने फटके मारून निदर्शन केले होते. जोपर्यंत एमके स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष सत्तेबाहेर होत नाही तोपर्यंत ते बूट घालणार नाहीत, अशीही शपथ अन्नामलाई यांनी घेतली होती. अन्नामलाई यांनी स्वत:ला अर्धनग्न केले आणि कोईम्बतूरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर स्वत:ला चाबकाने फटके मारले. त्यामुळे आप नेत्याने अन्नामलाई यांच्या निदर्शनाची नक्कल केल्याचे बोलले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा