मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यास मुंडन करण्याच्या विधानावरून ‘आप’चे नेते सोमनाथ भारती यांचा यु-टर्न

स्वतःच्या वक्तव्यावरून सोमनाथ भारती यांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न

मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यास मुंडन करण्याच्या विधानावरून ‘आप’चे नेते सोमनाथ भारती यांचा यु-टर्न

आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी लोकसभा निवडणूक निकालापूर्वी विधान केलं होतं. “नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन. ४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील. दिल्लीतील सातही जागा इंडिया आघाडी जिंकेल,” असं सोमनाथ भारती यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांचे भाकीत आता खोटे ठरल्यानंतर सोमनाथ भारती यांनी त्यांच्या वक्तव्यावरून यु-टर्न घेतला आहे. त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला आहे.

सोमनाथ भारती यांनी त्यांच्या वक्तव्याची सारवासारव करताना म्हटले आहे की, नरेंद्र मोदींची तिसरी टर्म ही त्यांची एकट्याची नसून एनडीएच्या मित्रपक्षांच्या संयुक्त प्रयत्नांचं फळ आहे. सोमनाथ भारती म्हणाले आहेत की, “मी म्हणालो होतो की, मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यास मुंडन करेन. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वबळावर जिंकलेले नाहीत, त्यांनी युतीच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकली आहे. मी माझ्या शब्दावर ठाम आहे, पण ते स्वबळावर जिंकले नाहीत, त्यामुळे हा त्यांचा विजय नाही. म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे जर ते स्वतंत्रपणे जिंकले असते तर मी माझं मुंडन केलं असतं,” असं म्हणत सोमनाथ यांनी यु-टर्न घेतला आहे.

हे ही वाचा:

दहशतवाद्यांनी २० मिनिटे गोळीबार केला आणि…. जखमी यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

रशियाच्या लढाऊ विमानाला युक्रेनने केले लक्ष्य!

टेस्लाच्या एआय यंत्रणेत भारतीय वंशाच्या इंजिनियरचे योगदान!

ओडिशातील भाजपचे पहिले सरकार १०जूनऐवजी १२ जून रोजी शपथ घेणार!

सोमनाथ भारती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर निकाल जाहीर होण्यापूर्वी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन असं म्हटलं होतं. “नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन. माझे हे शब्द लक्षात ठेवा. ४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील आणि मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत. दिल्लीतील सातही जागा इंडिया आघाडी जिंकेल. मोदीजींच्या भीतीमुळे एक्झिट पोल त्यांना पराभूत झाल्याचे दाखवू देत नाहीत. त्यामुळे आपल्या सर्वांना ४ जूनला निकालाची वाट पाहावी लागेल. जनतेने भाजपाच्या विरोधात प्रचंड मतदान केलं आहे,” असं सोमनाथ यांनी म्हटलं होतं. मात्र, यानंतर नरेंद्र मोदी आणि भाजपा यांचा विजय ही झाला आणि नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथही घेतली.

Exit mobile version