पंजाबमध्ये १ जुलैपासून ३०० युनिट वीज मोफत

पंजाबमध्ये १ जुलैपासून ३०० युनिट वीज मोफत

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने विजय मिळवून सत्ता स्थापन केल्यानंतर भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल १ जुलैपासून ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. १६ तारखेला पंजाबच्या जनतेला मोठी बातमी देऊ, असे भगवंत मान गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

पंजाबमधील प्रत्येक घरात ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन ‘आप’ने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंजाबच्या जनतेला दिलं होतं. त्यानंतर पंजाबमधील विधानसभा निवडणूका जिंकून सत्तेत आलेल्या आप सरकारने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली निवडणूकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची पावलं उचलली आहेत.

पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आकडेवारीनुसार,  राज्यामध्ये ७३.८० लाख घरगुती ग्राहकांपैकी जवळपास ६२.२५ लाख घरांमध्ये वीजेचा वापर हा ३०० युनिटपेक्षा कमी आहे. त्यामुळे जवळपास ६२.२५ लाख घरांना या निर्णयाचा फायदा होणार असून या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर किमान ५ हजार ५०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

हे ही वाचा:

दोन एक्स्प्रेस धडकल्या; मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत

रामदूत, अंजनि-पुत्र हनुमान

‘द काश्मीर फाइल्स’ नंतर आता येणार ‘द दिल्ली फाइल्स’!

अबब!! ‘KGF- Chapter 2’ची केवढी ही कमाई

गेल्या महिन्यात मान यांनी राज्यात घरोघरी रेशन डिलिव्हरी योजना आणली होती. हा सुद्धा आपचा निवडणुकीतील मुख्य प्रचार अजेंड्याचा भाग होता. त्यानंतर आता पंजाबमधील प्रत्येक घरात ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Exit mobile version