अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी

अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंजाबची सत्ता काबीज केल्यानंतर आता आपने गुजरातकडे मोर्चा वळवला आहे. त्या अनुषंगाने शनिवार दोन एप्रिल रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवान हे दोघेही गुजरात दौऱ्यावर आहेत. या वेळी केजरीवाल यांचा रॉड शो झाला. पण या दौऱ्या दरम्यान झालेल्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी जमा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गुजरात दौऱ्यावर असलेल्या अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. साबरमती आश्रमात त्यांनी सूत कताई देखील केली. तर त्यानंतर आश्रमातील कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते रोड शो साठी रवाना झाले.

हे ही वाचा:

वसईत एका वकिलाच्या घरावर धर्मांध मुस्लिमांकडून दगडफेक, गाडीची तोडफोड

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांचे लोकार्पण

….म्हणून दिल्लतील यूएस दूतावासाबाहेर लोकांनी पोस्टर चिकटवले

‘त्या’ घटनेनंतर विल स्मिथने हॉलिवूडच्या अकादमीचा दिला राजीनामा

अहमदाबाद येथे अरविंद केजरीवाल यांचा हा रोड शो पार पडला. या रोड शो ला तिरंगा गौरव यात्रा असे नाव आपच्या माध्यमातून देण्यात आले होते. या रोड शो ला नागरिकांनीही प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. पण असे असले तरी देखील या रोड शोला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा आरोप अरविंद केजरीवाल आणि आप पक्षावर होत आहे. याबाबतचे पुरावेही समोर आले आहेत. भाजपा सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक अमित मालवीय यांनी या संदर्भातील व्हिडिओ ट्विट केला आहे.

या व्हिडिओमध्ये एक इसम काही तरुणांना पाचशेच्या नोटा आणि आप पक्षाचा स्कार्फ देताना देत दिसत आहे. त्यासोबतच भारताचा राष्ट्रध्वज तिरंगाही या मुलांच्या हाती सोपविण्यात येत आहे. पक्षाच्या रॅलीत येण्यासाठी त्यांना हे पैसे दिले जात आहेत असे ती मुले व्हिडिओत सांगताना दिसत आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

Exit mobile version