गुजरातमध्ये इसुदान गडवी असतील आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

गुजरात निवडणुकीसाठी सज्ज

गुजरातमध्ये इसुदान गडवी असतील आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

आम आदमी पार्टीने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला आहे. पक्षाने पत्रकार इसुदान गढवी यांची मुख्यमंत्रीपदी उमेदवारी केली आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदासाठी इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली आहे. इसुदान गढवी हे सध्या पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत.

निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीच्या तारखा एक दिवस आधी जाहीर केल्या आहेत. राज्यात १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यासोबतच सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस, आप आणि एआयएमआयएमसह अन्य पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. इसुदान गढवी यांच्यासोबत गोपाल इटालिया यांचेही नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते असे म्हटल्या जात आहे.

विशेष म्हणजे केजरीवाल यांनी गुजरातमध्ये पक्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करताना केजरीवाल म्हणाले, आम्हाला १६ लाख ४८ हजारांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत. यापैकी सुमारे ७३टक्के लोकांनी इसुदान गढवी यांचे नाव निवडले.

हे ही वाचा:

उपमुख्यमंत्री विठुरायाचरणी! शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं

संभाजी भिडे आणि पुरोगामी किडे

‘आळशी माणूस ऑफ द इयर’ शोधायचा असेल तर मातोश्रीवर जा

चार कोटींची ‘साडी आणि बूट’ पकडले

“माझ्यावर विश्वास ठेवून, माझ्यासारख्या सामान्य माणसावर इतकी मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल मी आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल जी यांचे मनापासून आभार मानू इच्छितो असे गढवी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये आप आणि अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version