गुजरातमधील विधानसभेच्या निवडणुकांसाठी सध्या आम आदमी पार्टी तयारी करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी घोषणांचा सपाटा लावला असून त्यात मोफत वीज आणि बेरोजगारांना घरबसल्या ३००० रुपये अशा घोषणांचा समावेश आहे.
केजरीवाल यांनी म्हटले आहे की, आम्ही गुजरातमधील जनतेला पहिले आश्वासन देतो आहोत ते वीजेच्या पुरवठ्याबद्दल. गुजरातमधील जनता वीजबिलांमुळे त्रस्त आहे. विजेचे बिल अव्वाच्यासव्वा येते आहे. आम्ही दिल्लीत वीजेचा पुरवठा मोफत केला आहे. पंजाबमध्येही २५ लाख घरात आम्ही वीज बिल शून्य केले आहे. पंजाबमध्ये लवकरच ५१ लाख घरात वीज बिल शून्य केले जाईल. गुजरातमध्येही २४ तास वीज घराघरात पोहोचेल अशी घोषणा आम्ही करत आहोत. आदल्या वर्षाचे वीज बिलही आम्ही माफ करू.
हे ही वाचा:
अग्रलेख लिहिणारे डुप्लिकेट संजय राऊत आहेत का?
१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार
म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे
सुवर्णपदक हुकलेल्या पूजा गेहलोतला पंतप्रधान मोदींनी दिले प्रोत्साहन
केजरीवाल यांनी अशीही घोषणा केली की, आम्ही गुजरातमध्येही बेरोजगारांच्या हाताला काम देऊ. जर तरुण बेरोजगार असेल तर त्याला प्रत्येकी प्रतिमहिना ३ हजार रुपये दिले जातील. दिल्लीत आम्ही १२ लाख युवकांना नोकऱ्या दिल्या आहेत.
केजरीवाल यांनी दिल्लीतील निवडणुकीवेळीही अशा मोफत घोषणांचा सपाटा लावला होता. तिथे त्यांना विजय नक्की मिळाला मात्र त्यातून राज्याच्या खजिन्यावर प्रचंड भार आलेला आहे. मध्यंतरी देशभरातील सचिवांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी अशा मोफत योजनांबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच अशा फुकटच्या योजनांमुळे देश श्रीलंका किंवा ग्रीसच्या पावलावर पाऊल टाकू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या सचिवांनी बैठका घेतल्या होत्या त्यात ही चिंता व्यक्त केली होती. अनेक निवडणुकांच्या निमित्ताने राज्य सरकारे मोफत योजनांची घोषणा करतात त्यातून ही राज्ये आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनू शकतात.