फॉक्सकॉन आमच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेला नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही येणार नाही असे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसांईनी सांगितलं होतं.महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडलं जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन दोन्ही प्रकल्प वेगवेगळे आहेत हे सांगितले पण एअरबस टाटा किंवा बल्क ड्रग पार्क यावर त्यांनी पुरावे सादर केले नाहीत. उलट फडणवीसांची माहिती दिशाभूल करणारी असल्याची टीका त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील उद्योगांच्या संदर्भात सुरु असलेल्या आरोपांच्या फैरीचा समाचार घेतला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. आदित्य ठाकरे म्हणाले की राज्यातून बाहेर गेलेला वेदांता फॉक्सकॉन आणि आधीचा फॉक्सकॉन प्रकल्प वेगळा आहे . राज्यातून आता बाहेर गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरचा आहे २०२० साली बाहेर गेलेला फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल संबंधित होता . फडणवीस सांगत असलेला प्रकल्प वेगळा आहे. आकड्यांचा खेळ करण्यात काही जण माहीर असतात असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
ठाकरे पुढे म्हणाले की वेदांत फॉक्सकॉनचे दोन प्रस्ताव आहेत. ६ मे २०२२ रोजी महाराष्ट्रात वेदांताला भेट देण्यात आली होती. २४ फेब्रुवारी २२ रोजी त्या जागेवर भेट देण्यात आली होती. मविआने गुजरातपेक्षा जास्त सबसिडी वेदांतला दिली होती. सुभाष देसाई यांनी केलेले प्रेझेंटेशन खोटे का ? प्रकल्पासाठी नीती आयोगाची भेट घेण्यात आली होती. प्रस्तावच गेला नाही हा आरोप खोटा असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा:
भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू
मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी
मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश
भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची
फडणवीसांची पत्रकार परिषद दिशाभूल करणारी’, मुख्यमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित होते.परंतु उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. वेदांतापेक्षा मोठा उद्योग आणण्याचं गाजर दिले. वेदांतापेक्षा मोठा उद्योग आणणार होते, दीड लाख कोटी कुठे व दोन हजार कोटी रूपये कुठे असा सवालही ठाकरे यांनी केला. इलेक्ट्रॉनिक हब वेदांतपेक्षा लहान प्रकल्प असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.