अजान ऐकून आदित्य ठाकरेंनी थांबवले भाषण

अजान ऐकून आदित्य ठाकरेंनी थांबवले भाषण

महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अजानच्या वेळी काही मिनिटे भाषण थांबवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर लाऊडस्पीकरवरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आदित्य ठाकरे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार दिलीप लांडे यांच्या चांदिवली मतदारसंघात होते. आदित्य ठाकरे यांचा चांदिवली दौरा हा त्यांच्या ‘निष्ठा यात्रे’चा एक भाग होता, जी त्यांनी आठवडाभरापूर्वी सुरू केली होती. आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू असताना अजान सुरु झाली. त्यावर ‘मला वाटतं दोन मिनिटं थांबूया यांच्यासाठी’ असं म्हणत आदित्य ठाकरे काही काळ थांबले. काही मिनिटं वाट पाहत आदित्य ठाकरेंनी घड्याळात पाहिलं आणि पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

आदित्य ठाकरे यांनी अजान दरम्यान भाषण थांबवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेक जण संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक आदित्यचा प्रत्येक धर्माचा आदर करत त्याचे समर्थन करत आहेत आणि त्याची प्रशंसा करत आहेत, तर काही लोक या प्रकरणाला लाऊडस्पीकरच्या वादाशी जोडत आहेत.

हे ही वाचा:

पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी

मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी

काय होता लाऊडस्पीकरचा वाद

वास्तविक, मशिदींमधील लाऊडस्पीकरच्या वादाच्या वेळी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. त्यांचे चुलत भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपण मशिदींतील लाऊडस्पीकरच्या विरोधात असल्याचे जाहीर केले होते. जर मशिदीत लाऊडस्पीकर वाजवले गेले तर ते बाहेर हनुमान चालीसाचे पठण करतील असे म्हटले होते.

Exit mobile version