राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले. बहुजनांचा राम आहे. राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते, अशा आशयाचे वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केले आहे. यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
आचार्य तुषार भोसले म्हणाले की, “रामायणात शुर्पणका देखील रावणाला सांगते, प्रभू श्री राम आणि लक्ष्मण हे दोघे वनवासात कंदमुळे, फळं खातात. पण, हा नालायक जितेंद्र आव्हाड म्हणतो, राम मांसाहारी होते. तुमच्या दीड दमडीच्या राजकारणासाठी आणि मुल्लांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जात आहात. सर्वांची अस्मिता असणाऱ्या प्रभू श्री रामांना तरी यातून सोडा,” असा जोरदार शाब्दिक हल्ला त्यांनी केला आहे. शरद पवार तुमच्या चेल्यांना सुधारायला सांगा नाहीतर आणखी वाईट दिवस भोगावे लागतील असा इशारा देखील आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवारांना दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य काय?
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र, आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?” असं जितेंद्र आव्हाड शिर्डीतील शिबिरात म्हणाले.
हे ही वाचा:
महालक्ष्मी रेसकोर्सवर डोळा नेमका कोणाचा?
पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…
अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच
रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र
तसेच शिबिरानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत.”