सचिन वाझे प्रकरणामध्ये आता पहिल्यांदा एका महिलेची एन्ट्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये एक महिला सचिन वाझेला भेटून निघत असल्याचं दिसलं होतं, हीच ती महिला असल्याचं सांगितलं जातं आहे. काल एनआयएने एअरपोर्टवरून एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ही महिला सचिन वाझेच्या पैशांचा व्यवहार बघत होती असा संशय एनआयएला आहे. मात्र ही महिला नेमकी कोण आहे? तिचा सचिन वाझेशी काय संबंध ? या सर्व प्रश्नांची उत्तरं एनआयए शोधत आहे.
एनआयएने काल एअरपोर्टवरून एका महिलेला चौकशीसाठी आणलं. ही महिला मीरा रोडच्या एका इमारतीत भाड्याने राहत होती. ही महिला सचिन वाझेच्या पैशांचा व्यवहार बघत असून वाझेच्या काळ्या पैशांना व्हाईट करण्याचं काम ती करत होती, अशी शक्यता एनआयएकडून व्यक्त करण्यात येत आहे. या महिलेचे दुबई आणि इतर आखाती देशामध्ये मोठे नेटवर्क आहे ज्याचा वापर करुन वाझे मुंबईतील वसूल केलेले पैसे देशाबाहेर पाठवत असल्याची माहिती एनआयएकडे आहे.
हे ही वाचा:
पुण्यातील संचारबंदीला भाजपाचा विरोध
महाराष्ट्र पोलिसांमुळेच वाचले, ३० कोटी अन् बिल्डर जितू पटेल
वाझे प्रकरणात अबू आझमींचा खळबळजनक खुलासा
भाजपा सत्तेवर आल्यानंतर सीमेवरून माणूसच काय पक्षीही घुसू देणार नाही
गेल्या पंधरा दिवसांपासून एनआयए या महिलेचा शोध घेत होती मात्र या महिलेचा कुठेच पत्ता लागत नव्हता. मिरा रोड मध्ये एका इमारतीत ही महिला भाड्याने राहत होती पण ते घरही बंद होतं. या घराचे मालक पियुष गर्गची एनआयए कडून चौकशी करण्यात आली आणि अखेर या महिलेची माहिती एनआयएला मिळाली. ही महिला मुंबईबाहेर होती. ती मुंबईत परत येत असल्याची माहिती मिळताच एनआयएने तिला एअरपोर्टवरुन अगोदर तिच्या मीरा रोडवरील घरी आणि नंतर एनआयए कार्यालयात चौकशीसाठी आणलं.
सचिन वाझे प्रकरणात सात गाड्या मिळाल्यानंतर आता एका महिलेची एंट्री झाली आहे.