26 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरराजकारणसमान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल

समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मांडले मत

Google News Follow

Related

“समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल आणि युसीसीच्या अंमलबजावणीमध्ये आणखी विलंब झाल्यास तो आपल्या मूल्यांसाठी मारक ठरेल,” असे मत भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले आहे. आयआयटी गुवाहाटीच्या २५ व्या दीक्षांत समारंभाला मंगळवारी उपराष्ट्रपतींनी मार्गदर्शन केले. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे देशाच्या प्रशासनात मूलभूत आहेत आणि त्यांचे नियम बनवणे हे राज्याचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

भारताची प्रतिमा डागाळण्याचा आणि राष्ट्रविरोधी भूमिका बांधण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे याविरुद्ध सावधगिरी बाळगत अशा प्रवृत्तींना प्रभावीपणे नाकारण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले. “कोणत्याही परदेशी घटकाला आपल्या सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेशी छेडछाड करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही,” असे स्पष्ट मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.

“जागतिक शांतता आणि सौहार्दाला स्थैर्य देणारी सर्वात जुनी, सर्वात मोठी, सर्वात कार्यशील आणि चैतन्यमय लोकशाही म्हणून भारताचे वर्णन करताना आपण आपली समृद्ध आणि बहरणारी लोकशाही तसेच संवैधानिक संस्थांना धक्का लावू देऊ शकत नाही.” असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं.

हे ही वाचा:

वरळी सी- फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

शस्त्रे लुटण्यासाठी आलेल्या जमावाला लष्कराने रोखले; एक ठार

अमेरिकी वृत्तपत्रांकडून भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांचे कौतुक

वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेचेही आव्हान संपुष्टात

भ्रष्टाचाराला आता थारा नसल्याचे नमूद करून त्यांनी भ्रष्टाचारमुक्त समाज घडवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी भारतीयत्वाचा आणि त्याच्या ऐतिहासिक कामगिरीचा अभिमान बाळगावा असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आर्थिक राष्ट्रवादासाठी वचनबद्ध राहावे आणि राष्ट्र तसेच राष्ट्रवादाची किंमत मोजून आर्थिक नफा मिळवण्यापासून परावृत्त व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा