“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो” उल्लेख असलेला धमकीचा मेल

पुण्यातील व्यक्तीला विदेशातील अज्ञात व्यक्तीकडून ईमेल

“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो” उल्लेख असलेला धमकीचा मेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे पंतप्रधानांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच देशात सिरीयल ब्लास्ट करण्यात येणार असून हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन, अशा आशयाचा मेल करत अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणणार आहे. “आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो”, असा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक ईमेल आला आहे. त्यामध्ये असा धमकी देणारा मजकूर होता. एम. ए. मोखीम असं धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तसेच आपण अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. देशात अनेक ठिकाणी सिरीयल ब्लास्ट घडवण्याची योजना असल्याचे या मेलमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

फुले साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांचे निधन

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार

खोट्या बातम्या पसरवणाऱ्या आठ युट्युब चॅनल्सवर बंदी

युती ठाकरेंनी तोडली, भाजपाने नाही

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर ज्या व्यक्तीला हा ईमेल मेसेज आला होता. त्यांनी पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे पुण्यात दहशतवाद्यांना अटक होत असताना असा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. अलंकार पोलिस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version