27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानात होणार श्रीलंकेसारखी परिस्थिती

पाकिस्तानात होणार श्रीलंकेसारखी परिस्थिती

Google News Follow

Related

पाकिस्तानात सरकार बदलल्यानंतरही ना राजकीय परिस्थिती स्थिर होतेय ना आर्थिक संकट थांबण्याचे नाव घेत आहे. पाकिस्तानातील घसरणारे चलन आणि परकीय चलनाच्या संकटामुळे पाकिस्तानची श्रीलंकेसारखी परिस्थिती होऊ शकते असे म्हटले जात आहे. तर पाकिस्तान लवकरच डिफॉल्टर देश होऊ शकतो असे देखील म्हटले जात आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या कोणीही गुंवणूक करत नाही आहे. पाकिस्तानला श्रीलंकेसारखी परिस्थिती टाळायची असेल, तर त्याच्याकडे फक्त बेलआउट पॅकेज आहे. बेलआउट पॅकेज न मिळाल्यास पाकिस्तानला जागतिक डिफॉल्टर घोषित करण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. मात्र, हे बेलआउट पॅकेज घेण्यासाठी पाकिस्तानला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतील, ज्यामुळे राजकीय परिस्थिती आणखी बिघडू शकते.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार भारतातील सगळ्यात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उदघाटन

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर! २० जूनला होणार मतदान

अमेरिकेच्या कानशिलावर ‘बंदूक’!

यशवंत जाधवांना ईडी पुन्हा समन्स पाठवणार?

इम्रान खानमुळे पाकिस्तान सरकारची चिंता वाढली आहे. ते सरकारच्या विरोधात सातत्याने आंदोलन करत असून त्यांचे समर्थक यावर्षी निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. इम्रान खानला पाकिस्तनात पुन्हा सत्ता काबीज करायची आहे. जर पाकिस्तानला आयएमएफ कडून मदत मिळाली नाही तर इथेही आयातीवर मोठे संकट येऊ शकते. यावेळी श्रीलंकेला ज्या प्रकारे पेट्रोल आयात करता येत नाही, तीच परिस्थिती पाकिस्तानची होऊ शकते. आयएमएफने पाकिस्तानसमोर एक अट घातली आहे. ज्यामध्ये जोपर्यंत इंधनावरील सबसिडी बंद होत नाही तोपर्यंत पाकिस्तानला कर्ज मिळू शकणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा