ठाण्यामधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.मीरा भाईंदर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका व शहर अध्यक्ष तारा घरत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.त्यामुळे ठाण्यामधून ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका व शहर अध्यक्ष तारा घरत यांचा पक्ष प्रवेश पार पडला.यावेळी ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार निलेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक आदि उपस्थित होते.दरम्यान, विधानसभेपूर्वी ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा..
सिक्कीममध्ये भूस्खलन होऊन १२०० हून अधिक पर्यटक अडकले; नऊ जणांचा मृत्यू
आगीच्या अफवेवरून ट्रेनमधील प्रवाशांनी मारल्या उड्या, तिघांचा मृत्यू!
‘जी ७ शिखर परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान मोदी मायदेशी परतले’, ‘इटलीचे मानले आभार’!
केजारीवालांचा न्यायालयातील व्हिडीओ पोस्ट प्रकरणी पत्नी सुनीता यांना नोटीस
लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली असून आता सर्वांचे लक्ष्य विधानसभेवर आहे.त्यामुळे बरेच मंत्री, नेते, कार्यकर्त्ये आपआपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळणार आहे.दरम्यान, विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटातून अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.