मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, रामनिवास रावतांचा भाजपात प्रवेश!

मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत झाला पक्ष प्रवेश

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, रामनिवास रावतांचा भाजपात प्रवेश!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.काल(२९ एप्रिल) इंदूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अक्षय बम यांनी आपला अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज(३० एप्रिल) काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री रामनिवास रावत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रामनिवास रावत हे विजयपूरमधून सहा वेळा आमदार राहिलेले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रामनिवास रावत यांना मुरैना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, मात्र पक्षाने माजी आमदार सत्यपाल सिंह सिकरवार नीतू यांना तिकीट दिले, त्यानंतर रामनिवास रावत नाराज झाले होते.यानंतर त्यांच्या भाजपात प्रवेशाच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांसोबत चकमक, ७ माओवादी ठार!

शरद पवार कृषिमंत्री असताना काय केले?

नाशिक: एसटीची ट्रकला धडक, १० जण ठार!

‘मोदी पाठून हल्ला करत नाही जे करतो ते उघडपणे करतो’

२५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुरैना दौऱ्याच्या वेळी आमदार रामनिवास रावत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी आली होती, मात्र राहुल गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर रामनिवास रावत यांनी भाजपमध्ये प्रवेश रद्द केला होता. परंतु, रामनिवास रावत यांनी त्यांच्या समर्थकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Exit mobile version