काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजस्थानमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट संघर्ष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड करण्याचा श्रेष्ठींचा विचार आहे. राजस्थानची गादी सचिन पायलटक यांच्याकडे सोपवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाविरोधात गेहलोत गटाने बंडखोरी दर्शवली आहे. पायलट यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये यासाठी ही मागणी कायम ठेवून गेहलोत गटाच्या ८० हुन अधिक आमदारांनी राजीनामे दिले आहेत.
रविवारी रात्री विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांच्याकडे आमदारांनी राजीनामे सादर केले आहेत. काँग्रेस विधिमंडळाची बैठक मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवास्थानी रविवारी पार पडली. त्यावेळी तिथे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन तसेच माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट हे उपस्थित होते. मात्र, बैठकीला काँग्रेसचे केवळ २५ आमदार उपस्थितीत होते. गहलोत सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रताप खाचरियावास यांनी आमदारांच्या राजीनाम्याबाबत सांगितले आहे. हायकमांडने आमदारांचे मतं न घेताच निकाल देण्याचा निर्णय घेतला आहे, जो योग्य नाही, असे मतं प्रताप खाचरियावास यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
नवरात्र २०२२: महाराष्ट्राचं शक्तीस्थळ तुळजापूर
नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू
विलेपार्लेमध्ये घरांना तडे जाऊन आठ झोपड्या कोसळल्या
राजस्थानमध्ये काँग्रेसचे १०८ आमदार असून, बहुतांश आमदारांनी अशोक गेहलोत यांना समर्थन दर्शवले आहे. आतापर्यंत ८२ आमदारांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. राजीनामे देणाऱ्या आमदारांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाला विरोध केला जातं आहे.
एक व्यक्ती एक पद या तत्त्वासाठी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व कॉंग्रेस नेते राहुल गांधी आग्रही आहेत. यामुळे कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची असल्यास गहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री सोडले पाहिजे असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. परंतु, अशोक गेहलोत व त्यांच्या आमदारांना ते मान्य नव्हते.