राकेश टिकैत यांनी दिली ही नवी धमकी…

राकेश टिकैत यांनी दिली ही नवी धमकी…

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मंगळवारी केंद्राला ‘संसदेवर कूच’ करण्याचा इशारा दिला. तीन कृषि कृती कायद्याच्या विरोधात सुमारे तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सीकरमधील संयुक्त किसान मोर्चाच्या किसान महापंचायतीत बोलताना टिकैट म्हणाले की, “हे ‘वादग्रस्त’ कायदे रद्द न केल्यास आंदोलन करणारे शेतकरी संसदेला घेराव घालतील.”

“यावेळी हा घेराव संसदेचा असेल, आम्ही त्याची घोषणा करू आणि त्यानंतर दिल्लीकडे कूच करू. यावेळी चार लाख ट्रॅक्टरऐवजी 40 लाख ट्रॅक्टर असतील.” असेही ते म्हणाले. टिकैत यांनी शेतकऱ्यांना तयार राहण्याचे आवाहन केले. कधीही ‘चलो दिल्ली’ चे आवाहन करण्यात येईल असेही ते म्हणाले. इंडियागेट परिसरातील जमिनीची नांगरणी करून तिथे आम्ही शेती करू असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

आंदोलनकर्ते टिकैत यांच्या विरोधात?

२६ जानेवारीला राजधानी दिल्लीमध्ये अशाच पद्धतीची ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती. या रल्यचे रूपांतर लगेचच हिंसाचारात झाले होते. दिल्लीमध्ये चारशे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. याखेरीज लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडाही फडकवण्यात आला होता. २६ जानेवारीला चार लाख ट्रॅक्टर हे या गल्लीमध्ये होते अशी माहिती टिकैत यांनी दिली तर आता चाळीस लाख ट्रॅक्टर संसदेला घेराव घालतील असेही ते म्हणाले.

Exit mobile version