मतदारांशी संपर्क साधण्यात राहुल गांधींकडून चूक

मतदारांशी संपर्क साधण्यात राहुल गांधींकडून चूक

सुरुवातीला देशातील अधिकाधिक मतदार काँग्रेसशी जोडलेले होते. प्रत्येक जात, धर्म, वर्गाचे लोक काँग्रेसशी जोडलेले होते. मात्र ते एकामागोमाग एक काँग्रेसपासून दूर झाले. सन २०१४मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने सलग १० वर्षे काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले. सन २०१९नंतर राहुल गांधी आपल्या परीने काँग्रेसला पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते लोकांना जोडण्यासाठी भारत जोडो यात्राही करत आहेत. मात्र तरीही त्याचा म्हणावा तसा परिणाम झालेला नाही.

राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीमुळेच अनेक जण काँग्रेसपासून दूर जात आहेत. भारत जोडो न्याय यात्रेसोबत राहुल गांधी जेव्हा रायबरेलीला पोहोचले, तेव्हा नागरिकांमधील नाराजी स्पष्टपणे दिसून आली. रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी २९ ठिकाणे निवडली गेली होती. त्या सर्व ठिकाणी राहुल गांधी पोहोचले खरे, तिथे त्यांचे जोरदार स्वागतही झाले. मात्र कार्यकर्त्यांच्या मनात एक अढी कायम राहिली.

हे ही वाचा:

रशियाचे दिवंगत नेते नॅव्हल्नी यांच्या सहकाऱ्यावर हातोड्याने हल्ला

खट्टर यांचे निकटवर्तीय ते हरयाणाचे मुख्यमंत्री

देशभरात १७ सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार

पाकिस्तानी नागरिक म्हणातायत, पंतप्रधान मोदींना सलाम!

संपूर्ण दौऱ्यात राहुल गांधी एकदाही गाडीतून उतरले नाहीत. अनेक लोकांना त्यांच्या जवळ जायचे होते, त्यांच्याशी हस्तांदोलन करायचे होते, मात्र त्यांना मनातल्या इच्छा मनातच दाबून टाकाव्या लागल्या. जर रायबरेलीतच ही परिस्थिती होती, तर अन्य भागाची काय असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. या एका घटनेमुळे गांधी कुटुंबीय येथील लोकांशी कसे जोडलेले नाहीत, हेच दिसून आले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना लोकांची अजिबात पर्वा नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे रायबरेलीतील मतदार कधीपर्यंत त्यांचे हे एकतर्फी नाते टिकवतील, अशी शंका उपस्थित होत आहे.

Exit mobile version