सर्वाधिक रुंदीचा मिसिंग लिंक बोगदा तयार होतोय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्या मार्गिकेची पाहणी

सर्वाधिक रुंदीचा मिसिंग लिंक बोगदा तयार होतोय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोणावळा येथे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या मिसिंग लिंक प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत लोणावळा तलावाच्या सुमारे ५०० ते ६०० फूट खोल असलेल्या बोगद्याची मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाहणी केली. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञाना वापर करून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जवळ जवळ ८ किमी लांबीचा हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ असून देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुण्याचे अंतर निम्म्या तासाने कमी होण्यास मदत होणार आहे. या बोगद्यामुळे घाटाचा भाग टाळला जाऊन अपघातात मोठ्या प्रमाणात घट होईल. प्रवास सुखकर होईल, वाहतुक कोंडी कमी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषणाला आळा बसून इंधनाची बचत होईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हा प्रकल्प करताना प्रवाशी आणि वाहनांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आलेला आहे. दरड कोसळू नये यासाठी रॉक बोल्ट करण्यात आले आहेत. एखादा अपघात झाल्यास आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर पडण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर बाहेर जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला आहे. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटर कोटिंग असणार असून त्यावर आगप्रतिबंधक कोटींग करण्यात येणार आहे. अत्याधुनिक हाय प्रेशर वॉटर मिक्स यंत्रणा असून त्यामुळे आग लागल्यास ही यंत्रणा तात्काळ कार्यान्वित होऊन आग विझेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

असा आहे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प

या मार्गाचे ८ पदरीकरणाचे ५.८६ किमीचे काम पूर्ण झाले आहे. यात ३ मोठे पूल, लहान पूलांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत ९० टक्केपेक्षा काम पूर्ण झालेय. व्हायाडक्ट क्र. १ मधे ९०० मीटर लांबीचे दोन समांतर पूल असून डाव्या बाजूचे डेस्क स्लॅबचे व उजव्या बाजूच्या खांबांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

बोगदा क्र. १ च्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे एकूण १ हजार ५६० मीटरपैकी १ हजार ४५१ मीटर खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे एकूण १ हजार ५३० मीटरपैकी १ हजार ४५५ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.
व्हायाडक्ट क्र. २ हा ६५० मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्टे पूल असून पायलॉनचे काम प्रगती पथावर आहे. यामध्ये एकूण ४ पायलॉन समाविष्ट असून त्याची उंची १८१.७८ मीटर एवढी आहे. हा व्हायाडक्ट सर्वोच्च उंचीच्या व्हायाडक्ट पैकी एक आहे.

हे ही वाचा:

अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली

आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

बोगदा क्र. २ च्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे एकूण ८ हजार ७७६ मीटर पैकी ७ हजार ६९६ मीटर खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे एकूण ८ हजार ८२२ मीटरपैकी ७ हजार ५२९ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. बोगद्यांची रुंदी २३ मीटर असून आशिया खंडातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार आहे.

Exit mobile version