दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल महाविद्यालय उभारणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल महाविद्यालय उभारणार

राज्यातील प्रत्येक नागरिकांना चांगली व परवडणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देणे आवश्यक आहे. तसेच येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात यावीत यासाठी वैदयकीय शिक्षण विभागाने तयारी करावी, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रकल्पांना आशियायी विकास बँकेमार्फत (एशियन डेव्हल्पमेंट बँक) वित्त साहाय्य आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांसोबतची (इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशन) आढावा बैठक पार पडली. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय सुविधासाठी २०३० पर्यंतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र त्यात चांगल्या सुविधा, अति विशेषोपचार, आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचे धोरण असले पाहिजे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक व खाजगी भागीदारीचे धोरण आणले आहे.

हे ही वाचा:

इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

तसेच ‘इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशन’च्या मदतीने पहिल्या टप्प्यात संभाजीनगर, लातूर व नागपूर येथे सुपरस्पेशालिस्ट वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या महाविद्यालय राज्य शासनाची ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजना ही लागू होणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक व खाजगी भागीदारी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करताना ते वेळेत पूर्ण होईल. गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी पूरपरस्थिती वारंवार निर्माण होत आहे. ही परस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये, यासाठी पुराच्या पाण्याचे नियोजन, तसेच हवामान बदलावरील उपायोजनासाठी आशियाई विकास बँक राज्य सरकारला मदत करणार आहे. तसेच बँक आता वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा विभागाबरोबर विविध विषयांवर एकत्रित तांत्रिक अभ्यास करणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Exit mobile version