लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून मोट बांधणीला सुरुवात

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून मोट बांधणीला सुरुवात

आगामी वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीयांकडून मोट बांधणीला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांनीही भाजपाला पर्याय म्हणून इंडिया या नावाने आघाडी केली आहे. दरम्यान, मधल्या काळात काही महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

भाजपाकडून एकूण १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, नऊ सरचिटणीस आणि १२ सचिवांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तीन नेत्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.

भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नाड्डा यांनी शनिवार, २९ जुलै रोजी पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अंटोनी यांचे पुत्र अनिल अंटोनी यांचा समावेश भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीत केला असून त्यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच अनिल अँटनी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, पंकज मुंडे आणि विजया रहाटकर यांचा समावेश राष्ट्रीय सचिव म्हणून करण्यात आला आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि उत्तर प्रदेशमधील आमदार तारीक मन्सूर यांचा समावेश उपाध्यक्ष म्हणून करण्यात आला आहे. तसेच, तेलंगणा भाजपाचे माजी अध्यक्ष बांडी संजय कुमार यांचाही समावेश पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

सीबीआयकडून मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणात एफआयआर

छोटा शकीलचा शूटर लईक शेखच्या २५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मोहरमच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

मलकापूरमध्ये दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात प्रवाशांचा मृत्यू

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी

राष्ट्रीय उपाध्यक्ष

राष्ट्रीय महामंत्री

राष्ट्रीय सचिव

Exit mobile version