महाराष्ट्रात शेतकऱ्याचे नक्षलवादी होण्यासाठी परवानगी मागणारे पत्र

एका बाजूला केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करत आहे. शेतकऱ्यांकडून अधिक हमी भावाने खरेदी करत आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र याच्या विरुद्ध चित्र असल्याचे दिसत आहे

महाराष्ट्रात शेतकऱ्याचे नक्षलवादी होण्यासाठी परवानगी मागणारे पत्र

एका बाजूला केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करत आहे. शेतकऱ्यांकडून अधिक हमी भावाने खरेदी करत आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र याच्या विरुद्ध चित्र असल्याचे दिसत आहे. अखेरीस एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी मागितली आहे.

हे ही वाचा:

“उद्धव ठाकरे यांनी ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये.”

मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या या पत्रात शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्याची परवानगी मागितली आहे. त्यात असे म्हटले आहे की आमचा वडिलोपार्जित व्यवसाय शेती असेल तर आम्हाला एक वर्षाचा दुष्काळ का सहन होऊ नये? यात व्यवस्थेने आमच्या अंगाच्या चिंधड्या करून ठेवल्या आहेत असेही म्हटले आहे. या पत्रातून व्यवस्थेबद्दल लिहीताना कर्जमाफी पोहोचलीच नसल्याचे त्याने सांगितले आहे. पिकेल ते विकेल अशी योजना आणली तरी, आमच्याकडे पिकलंच नाही तर विकावं काय? असा उद्विग्न सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. त्यानंतर तो शेतकरी म्हणतो की, नुकसान एक हेक्टरचं आणि नुकसान भरपाई म्हणून मदत नऊ हजार रुपये फक्त मिळाले. लाईनमन देखील दादागिरी करून न सांगता लाईन कापून टाकत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. शिवाय बँका अजूनही पीक कर्ज द्यायला तयार नाहीत असेही सांगितले आहे. नामदेव पतंगे यांनी ही कैफियत अनेक शेतकऱ्यांची असल्याचे म्हटले आहे. नामदेव पतंगे हे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील टाकतोडा गावचे रहिवासी आहेत.

गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कधी दुष्काळ, अवकाळी अशा नैसर्गिक संकटांबरोबरच भाव पडणे, कोरोना सारख्या परिस्थितीमुळे उद्भवणारे लॉकडाऊन यांचा देखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिचून जाऊन किमान नक्षलवादी होण्यासाठी तरी परवानगी द्या अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

Exit mobile version