बलुचिस्तानमधील नेता घेणार पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ

काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अनवर ऊल हक्क काकर यांची निवड

बलुचिस्तानमधील नेता घेणार पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय हालचाली सुरू असून पाकिस्तानचे शहबाज शरीफ सरकार बर्खास्त झाले आहे. त्यानंतर पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अनवर ऊल हक्क काकर यांची निवड करण्यात आली आहे. काकर बलुचिस्तानचे रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त केली.

संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंबलीचा पाच वर्षांचा संविधानिक कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्यात आली. त्यामुळे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारचा कार्यकाळही संपुष्टात आला. त्यानंतर शनिवारी कार्यवाहक सरकारची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रपतींनी त्यांना शनिवार पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान निवडण्यास सांगितले होते.

चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अनवर रुल हक्क काकर यांची निवड करण्यात आली. माजी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाज यांना शनिवारपर्यंत राष्ट्रपतींकडे काळजीवाहू पंतप्रधानाचे नाव द्यायचे होते. त्यानंतर अनवर यांच्या नावावर दोन्ही नेत्यांनी एकमत व्यक्त केलं. अनवर बलुचिस्तान प्रांतातून असून ते शनिवारीच पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

शहबाज शरीफ आणि राजा रियाज यांच्यात काळजीवाहू पंतप्रधान निवडण्यासाठी अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या. पंतप्रधान छोट्या प्रांतातून येणारा असावा, त्यामुळे प्रांतातील प्रश्न प्राधान्याने सोडवता येतील, या मुद्द्यावर एकमत झाले. नॅशनल असेंबली संविधानाच्या आर्टिकल ५८ नुसार पाकिस्तानी संसद भंग करण्यात आली. संसदेचा पाच वर्षाचा कार्यकाळ अधिकृतरित्या १२ ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार होता. मात्र, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान शहबाज यांनी राष्ट्रपती अल्वी यांना पत्र लिहून संसद भंग करण्याची शिफारीश केली होती. आर्टिकल ५८ नुसार राष्टपतींनी पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार ४८ तासात संसद बरखास्त केली नाही तर ४८ तासानंतर संसद आपोआपच बरखास्त होते.

हे ही वाचा:

आता फसवणुकीसाठी ‘४२०’ नव्हे ‘३१६’ कलम

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटनाला चालना देणार

श्रीनगर एअरबेसवर मिग- २९ लढाऊ विमानांचा स्क्वॉड्रन तैनात

जया प्रदा यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास, पाच हजारांचा दंड; काय आहे प्रकरण?

दरम्यान, पाकिस्तानच्या संविधानानुसार, संसद भंग झाल्यानंतर पंतप्रधान आणि नॅशनल असेंबलीच्या विरोधी पक्ष नेत्याने तीन दिवसात हंगामी पंतप्रधानांचे नाव राष्ट्रपतीकडे सूचवायचे असते. त्यानुसार पंतप्रधान शरीफ आणि विरोधी पक्ष नेत्याने काळजीवाहू पंतप्रधानांचे सुचविले.

Exit mobile version