संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचे ठरणार

पंतप्रधान मोदींनी दिला सूचक इशारा

संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचे ठरणार

संसदेचे विशेष अधिवेशन सोमवार, १८ सप्टेंबर रोजी पासून सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी छोटा असला तरी या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले जातील असे म्हणत त्यांनी हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तविली आणि सूचक इशाराही दिला. सर्व खासदारांनी संसदेच्या कामकाजात सहभाग घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

संसदेचं अधिवेशन मंगळवार, १९ सप्टेंबर पासून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या ठिकाणी होणार आहे. “या नव्या ठिकाणी जाताना हे ठरवायचं आहे की, भारताला २०४७ पर्यंत आपल्याला विकसित राष्ट्र करायचं आहे. हे अधिवेशन अनेक प्रकारे महत्त्वाचं आहे. सर्व खासदारांनी या विशेष अधिवेशनातील कामकाजात जास्तीत जास्त भाग घ्यावा असा आग्रह मी खासदारांना करत आहे. जीवनात काही क्षण असे येतात की ज्यामुळे उत्साह वाढतो. त्यामुळे आता सर्व वाईट गोष्टी सोडून आपण चांगल्या गोष्टी घेऊन नव्या संसदेत जाऊया,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी चांद्रयान- ३ आणि जी- २० शिखर संमेलनाच्या यशाचे उल्लेख करताना म्हटलं की, भारताचे सामर्थ्य संपूर्ण जगाने पाहिले. आपला तिरंगा आज चंद्रावर फडकवत आहे. शिवशक्ती पॉईंट हे नवीन प्रेरणा केंद्र बनले आहे. या पॉईंटमुळे आपला ऊर अभिमानाने भरला आहे.” भारताला अभिमान वाटावा असे क्षण एकामागून एक आले आहेत. संपूर्ण देशात उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण आपण अनुभवत आहोत.

हे ही वाचा:

बेस्ट बसमध्ये पैसे विसरणारे प्रवासी वाढले; चार वर्षांत ८ हजार छत्र्याही लोक विसरले

भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक

‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?

संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने महाराष्ट्रातील सात कलावंतांना सन्मान

संसदेचे हे सत्र लहान असले तरी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचे असणार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. “गणेश चतुर्थीला नवीन संसदेत जाऊ. भगवान गणेशाला ‘विघ्नहर्ता’ म्हणूनही ओळखले जाते, आता देशाच्या विकासात कोणतेही अडथळे येणार नाहीत. संसदेचे हे अधिवेशन लहान असले तरी ते ऐतिहासिक आहे,” असा पुनरुच्चार नरेंद्र मोदींनी केला.

Exit mobile version