महाराष्ट्रात मोगलाई; शिवजयंतीच्या दिवशी पोवाडा म्हणणे गुन्हा, शिवशाहीराला अटक

महाराष्ट्रात मोगलाई; शिवजयंतीच्या दिवशी पोवाडा म्हणणे गुन्हा, शिवशाहीराला अटक

शिवजयंतीच्या दिवशी पोवाडा म्हणण्याचा गुन्हा केल्याबद्दल पुण्यात शिवशाहीर हेमंतराजे मावळे यांना अटक करण्यात आली. शिवजयंतीच्या दिवशी पोवाडा म्हणण्यास मज्जाव करणारे परीपत्रक सरकारने जारी केले होते. लाल महालात पोवाडा म्हणून या निर्णयाचा निषेध करणा-या शाहीर मंडळीना अटक करण्यात आली.

शिवजयंती साजरी करण्याबाबत महाविकास आघाडीची नकार घंटा शिवजयंतीपर्यंत कायम राहीली. राज्य सरकारने आधी शिवजयंतीच्या दिवशी मिरवणुकांवर बंदी घातली होती. परंतु ‘ही बंदी आम्ही मानणार नाही, आम्ही मिरवणुका काढणारच’, अशी भूमिका भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी घेतल्यावर सरकारने नमते घेतले. दहा ऐवजी १०० लोकांना शिवजयंती मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली. गृहविभागाने ११ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी पोवाड्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये म्हणून परीपत्रक काढण्यात आले होते.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य

शाहीर वर्गात यामुळे प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले. पोवाडा हा शिवजयंती उत्सवाचा आत्मा असल्यामुळे सरकारने ही बंदी मागे घ्यावी, अशी विनंती शाहीर हेमंतराजे मावळे यांनी ठाकरे सरकारला एका पत्राद्वारे केली. परंतु सरकारने आडमुठेपणा कायम ठेवल्यामुळे या निर्णयाचा धिक्कार करण्यासाठी लाल किल्ल्यात शिवजयंतीच्या दिवशी पोवाडा गाण्याचा निर्णय शाहीर हेमंतराजे यांनी घेतला. त्यानुसार आज लाल किल्ल्यात पोवाडा गाण्यासाठी एकत्र आलेल्या शाहीर आणि त्यांच्या सहका-याना शिवपोवाडा गाण्याच्या गुन्ह्याबद्दल पुणे पोलिसांनी अटक केली.

हेमंत राजे यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता त्यांनी झाल्याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘ज्या पक्षाच्या नावात शिव आहे त्या शिवसेनेचे सरकार असताना पोवाडा गायला म्हणून आम्हाला अटक व्हावी हा प्रकार धक्कादायक आहे. शिवजयंतीच्या दिवशी पोवाडा बंदीचा निर्णय आम्ही मान्य करणार नाही. सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठीच आम्ही लालकिल्ल्यात पोवाडा आंदोलन केले असे’, न्यूज डंकाश बोलताना सांगितले.

‘महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रिमोट कंण्ट्रोलधारी शरद पवार मुस्लीम मतांची बेगमी करण्यासाठी हे राजकारण करीत आहेत. शिवजयंतीच्या दिवशी पोवाडाबंदी हा तमाम शिवभक्तांचा अपमान असून राज्यात मोगलाई आल्याची भावना जनतेत आहे’, असे मत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version