भाजप नेते किरीट सोमय्या यांना विश्वास
आरे कारशेड मुंबई मेट्रोच्या कामाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शिंदे- फडणवीस सरकारने मेट्रोच्या कामाला पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणखी काही मेट्रो रुळावर धावण्यास सुरुवात होणार असल्याचा विश्वास भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
मेट्रो कारशेडची जागा कुठे असावी यावरून संघर्ष सुरू आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावच्या आरे कॉलनीतील जागा अधिग्रहित करून कामही सुरू केले होते. पण त्यावेळी याच मुद्यावरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी उडाली होती. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून पर्यावरणाच्या नावाखाली आरे कारशेडला सातत्याने खो देण्याचे प्रयत्न कायम सुरू ठेवले होते. कारशेडची जागा कांजुरमार्गला असावी असा ठाकरेंचा आग्रह होता. त्यामुळे सत्तेवर येताच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचा आरे कारशेडचा निर्णय हाणून पाडला आणि मेट्रो ३ साठी कांजुरमार्गमध्ये कारशेड उभारण्याची घोषणा केली. परंतु यावादात हा प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन वाढली. आरेतील झाडे कापण्यावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्यावर तातडीने पुन्हा मुंबई मेट्रोची जबाबदारी सोपवत फडणवीस यांनी ठाकरे यांना धक्का दिला.
हे ही वाचा:
अग्रलेख लिहिणारे डुप्लिकेट संजय राऊत आहेत का?
१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार
म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे
सुवर्णपदक हुकलेल्या पूजा गेहलोतला पंतप्रधान मोदींनी दिले प्रोत्साहन
मेट्रोच्या कामाला पुन्हा जोरदार सुरुवात
आरे कॉलनीतील २७०० झाडे कापल्याबद्दल पर्यावरणवाद्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही विरोध केला होता. आताही शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी पुन्हा तीच री ओढली आहे. किरिट सोमय्या या संदर्भात म्हणाले की, आरे कारशेड मुंबई मेट्रोच्या कामाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. काही पर्यावरणवादी विघ्न संतोषी लोकांनी मुंबई मेट्रोचे काम बंद पाडले होते उध्दव ठाकरे सरकारने २९ नोव्हेंबर २०१९ रोजी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. पण शिंदे- फडणवीस सरकारने मेट्रोच्या कामाला पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणखी काही मेट्रो रुळावर धावण्यास सुरुवात होणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.