खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

प्रक्षोभक भाषण करत दिला इशारा

खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

वारीस पंजाबचे प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून ‘जे इंदिरा गांधी यांच्याबरोबर झाले ते तुमच्याबरोबर होऊ शकते’ असे पंजाबी अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्धू याच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण करताना त्याने  म्हंटले आहे.

पुढे अमृतपाल सिग यांनी म्हंटले की, पंजाबमधील प्रत्येक मूल खलिस्तानबद्दल बोलतो जो त्यांना हवे ते करू शकतो आम्ही आमचे हक्क मागतो. गेले ५०० वर्ष आम्ही या भूमीवर राज्य केले आहे. या पृथ्वीवर आमचा हक्क आहे या पृथ्वीचे आपणच हक्कदार आहोत.  या पृथ्वीवर आमचा पण हक्क आहे. यातून कोणीही माघार घेऊ शकत नाही. मग ते अमित शाह असोत , मोदी असोत, किंवा भगवंत मान असोत. जगभरातून सैन्य आले आणि म्हंटले तरी ते आपला दावा सोडणार नाहीत.

पुढे त्यांनी सरकारवर आरोप केला आहे की, अमृत संचार समागम बंद करण्यासाठी सरकारने खूप प्रयन्त केले पण यश आले नाही. आधीच्या सरकारनेही आमचा मेळावा रोखण्याचा प्रयन्त केला होता. पुढे अमृतपाल सिंग यांनी असेही आरोप केले की, सरकारने आमचा प्रवास थांबवण्याचा सर्वोतपरी प्रयन्त केला गेला , पण शिखांनी त्यांच्याशी तीव्र संघर्ष केला. सरकार आम्हाला अटक करण्याविषयी बोलत आहे. त्यामुळे आम्ही गटबाजीसह अटक होतो हे सुद्धा त्यांना कळायला हवे. आम्ही तुरुंगात जाऊन धर्माचा प्रचार करायचा असेल तर तो सुद्धा करायला आम्ही तैयार आहोत.

हे ही वाचा:

शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार

आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा

रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…

बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!

मला पकडण्यासाठी सरकार छापे टाकण्याच्या खोट्या अफवा पसरवत असून , मी कुठे आहे हे सर्वांना माहित आहे. तुम्हाला काय करायचे आहे ते करा पण आमच्यासारख्या निरपराध्यांवर अत्याचार करू नका. रिमांडवर घेतलेल्या मुलाबद्दल बोलताना अमृतपाल म्हणाले , आता प्रत्येक मूल हे खलिस्तानींबद्दल बोलत आहे, यात त्याचा काय दोष तुम्हाला वाट्टेल ते करा , पण आमचे हक्क आम्हाला द्या.

Exit mobile version