उत्तर प्रदेशामध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. नेतेच नाही तर जनताही यात रस घेत आहे. दरम्यान, खेरगढ विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवारची चांगलीच चर्चा रंगली आहे. ते तब्बल ९४ वी निवडणूक लढवणार आहेत. मागील ९३ निवडणुका ते हरले आहेत.
हसनुराम आंबेडकरी असं या उमदेवाराच नाव असून ते आता ७४ वर्षाचे आहेत. हे खेरगढ विधानसभा मतदारसंघातील एक प्रसिद्ध उमेदवार आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे हसनुराम आंबेडकरी यांना शंभर वेळा निवडणूक हरण्याचा विक्रम करायचा आहे. तर आतापर्यंत ते ९३ वेळा निवडणूक हरले आहेत.
१९८५ पासून ते लोकसभा, राज्य विधानसभा, पंचायत निवडणुका आणि इतर विविध संस्थांच्या निवडणुका लढवत आहेत परंतु, एकाही निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालेले नाही. १९८८ मध्ये भारताच्या राष्ट्रपती पदासाठी त्यांचे नामांकन नाकारण्यात आले होते. ते कांशीराम यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशनचे (बीएएमसीईएफ) सदस्य आहेत. ते काही काळ बसपचे सदस्य होते. ते एक शेतमजूर म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडे मनरेगा जॉब कार्ड आहे. त्याचे कोणतेही औपचारिक शालेय शिक्षण झालेले नाही, परंतु त्यांना हिंदी, उर्दू आणि इंग्रजी लिहिता आणि वाचता येते.
आंबेडकरी म्हणाले, मी हरण्यासाठी निवडणूक लढतो. जिंकणारे नेते जनतेला विसरतात. मला शंभर वेळा निवडणूक हरण्याचा विक्रम करायचा आहे. माझे विरोधक कोण आहेत याची मला पर्वा नाही कारण मी मतदारांना आंबेडकरांच्या विचारधारेला पर्याय देण्यासाठी निवडणूक लढवतो. उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची मुळे मजबूत करण्यासाठी मी बसपसाठी काम केले आहे. १९८५ मध्ये जेव्हा मी तिकीट मागितले तेव्हा माझी खिल्ली उडवली गेली आणि सांगितले की माझी पत्नी देखील मला मतदान करणार नाही. त्याबद्दल मी खूप निराश झालो आणि तेव्हापासून मी प्रत्येक निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे.
हे ही वाचा:
अमरावती स्वित्झर्लंड आणि चीनपेक्षाही सरस!
दिल्लीत जानेवारी महिन्यात ३२ वर्षांत सर्वाधिक पाऊस…
नागपुरात एमपीएसी पेपरफुटी प्रकरणामुळे खळबळ; अभाविपचे तीव्र आंदोलन
गोवंडीत तरुणीवरील सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे संताप
आंबेडकरी यांनी १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत फिरोजाबाद मतदारसंघातून सर्वाधिक ३६ हजार मते मिळवली होती. २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी आग्रा आणि फतेहपूर सिक्री या जागांवरून लढवली होती पण त्यांना त्यांची अनामत रक्कमही वाचवता आली नाही. तर २०२१ मध्ये जिल्हा पंचायत निवडणूक लढवली.
सध्या आंबेडकरी पत्नी आणि समर्थकांसह घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. ते म्हणाले, “ माझा हेतू नेहमीच भ्रष्टाचारमुक्त विकास आणि समाजातील उपेक्षितांचे कल्याण करणे हा आहे.