सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीवर गुन्हा दाखल

रेल्वे खाली उडी घेऊन केली होती आत्महत्या

सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी समोर आला. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेकडून सुधीर मोरे यांना मानसिक त्रास दिला जात होता अशी तक्रार मोरे यांच्या मुलाने दिली होती. आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी माजी आमदारांच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार शांताराम चव्हाण यांची मुलगी निलिमा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलिमा चव्हाण आणि सुधीर मोरे यांच्यात शेवटचा संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकाजवळ आत्महत्या केली होती. दरम्यान निलिमा चव्हाण आणि मोरे यांच्यात शेवटचा संवाद झाला होता. त्यानुसार निलिमा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा:

डिजिटल इंडियाचे ऑगस्टमध्ये युपीआयद्वारे १ हजार कोटींपेक्षा जास्त व्यवहार!

चांद्रयान- ३ पेक्षाही कमी खर्चात आदित्य L1 सूर्याकडे पोहचणार

जेट एअरवेजचे नरेश गोयल यांना अटक

एका महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून सुधीर मोरे यांची आत्महत्या

गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात आले होते. सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरीचे संपर्कप्रमुख होते. सुधीर मोरे हे शिवसेनेचे नगरसेवक आणि विभागप्रमुखही होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठींबा दिला होता.

Exit mobile version