मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले आमदार संतोष बांगर रविवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत देवदर्शन घेतलं होतं. दरम्यान, काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. तसेच त्यांनी काही घोषणाही दिल्या. यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष बांगर हे अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी हल्लेखोरांनी हल्लेखोरांनी ‘आला रे आला, गद्दार आला’, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत त्यांच्या गाडीवर हल्ला केला. हल्लेखोरांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हाताने मारण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर काल रात्री उशिरा १५ ते २० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ला केलेल्या शिवसैनिकांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
नवरात्र २०२२: महाराष्ट्राचं शक्तीस्थळ तुळजापूर
नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू
विलेपार्लेमध्ये घरांना तडे जाऊन आठ झोपड्या कोसळल्या
भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’
हल्ला केल्यानंतर संतोष बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. तसेच गाडीत पत्नी आणि बहिण नसत्या तर यांना संतोष बांगर कोण आहेत हे दाखवून दिलं असतं असं ते म्हणाले. “माझ्या गाडीला कुणी स्पर्शही केला तरी आम्ही त्यांना सोडणार नाही” अशा आशयाचं वक्तव्य संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र, यावर ते अजूनही ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.