‘लाडली बहना योजने’विषयीचे वक्तव्य भोवले; संजय राऊतांवर गुन्हा दाखल

भोपाळमध्ये भाजपा महिला मोर्चाने पोलिसात केली तक्रार

‘लाडली बहना योजने’विषयीचे वक्तव्य भोवले; संजय राऊतांवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये खोटी अफवा पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. मध्य प्रदेशातील ‘लाडकी बहिण योजना’ बंद पडल्याचा दावा राऊतांनी केला होता. त्यानंतर भोपाळमध्ये भाजपा महिला मोर्चाने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर आता संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मध्य प्रदेशमधील लाडकी बहीण योजनेविषयीचे वक्तव्य करणे संजय राऊतांना चांगलेच भोवले आहे. लाडकी बहीण योजनेविषयी दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्यप्रदेश पोलिसांनी एफआयआर नोंदवला. भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा युनिटच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने बुधवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त अखिल पटेल यांनी ही माहिती दिली.

माहितीनुसार, भाजपा महिला मोर्चा जिल्हा युनिटच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांच्या तक्रारीवरून भोपाळ गुन्हे शाखेने बुधवारी संध्याकाळी राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेश सरकारची ‘लाडली बहना योजना’ ही केवळ राजकीय खेळी असल्याने बंद करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. आता या प्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

देशाने एक अनमोल ‘रतन’ गमावलं!

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा

पद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन

एटीएसची रत्नागिरीत मोठी कारवाई, पाच संशयिताना अटक

याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी काय चुकीचे बोललो आहे? जेव्हा आम्हाला न्यायालयात बोलवतील. तेव्हा आम्ही सांगू. खरोखर ‘लाडली बहन’ची काय स्थिती आहे हे त्यांनी जाहीर केले पाहिजे. महाराष्ट्रात लाडकी बहिणीच्या नावाखाली फसवा फसवी सुरू आहे. मतांसाठी लाडकी बहीण योजना आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version