‘मांसाहारी’ जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा

‘मांसाहारी’ जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

प्रभू श्री रामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त केले होते. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. श्री रामाबद्दल वादग्रस्त विधान करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपाने गुरुवारी आंदोलन केलं होतं. यावेळी धीरज घाटे यांनी विश्रामबाग पोलिसांकडे आव्हाडांविरोधात तक्रार दिली होती. यावरुन कलम २९५ अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक नेत्यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर गुरुवारी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला होता.

खेद व्यक्त करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी महाराष्ट्राला संबोधित करत असतो आणि मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण काल प्रभू श्रीरामांबद्दल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. तर कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्त्याव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी गुन्ह्याला घाबरत नाही. राम हा बहुजनाचा आहे आणि आमचा राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेतील शाळेत गोळीबार; एका विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबई आयआयटी; मुलांना कोटीकोटी

आव्हाड तुमचा रामाशी संबंध काय?

पंतप्रधान मोदींविरोधात केलेले वक्तव्य काँग्रेस नेत्याला भोवणार!

आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य काय?

आव्हाड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले होते की, “तुम्ही इतिहास वाचत नाही, मनात ठेवत नाही, राजकारणात आपण वाहत जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला चाललात पण आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि त्यामुळं मटणही खातो. हा रामाचा आदर्श आहे राम शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता. १४ वर्ष जंगलात राहणारा माणूस शाकाहार शोधायला कुठं जाणार?”

Exit mobile version