ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षपार्ह भाषेत टीका करणं चंद्रकांत खैरे यांच्या अंगलट आले आहे. सातारा येथे खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाची बाजू मांडताना खैरे शिंदे गटावर टीका करत आहेत. यादरम्यान चंद्रकांत खैरे यांनी रविवार, ९ ऑक्टोबर रोजी एका माध्यमाशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. आज आनंद दिघे असते तर शिंदेंना उलटं टांगलं असतं, अस विधान खैरे यांनी केलं. त्यानंतर शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली होती. त्यावरून सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रकांत खैरेंविरोधात ३५२ कलम १५३(अ),(१),(ब),१८९,५०५(१),(ब) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने मुख्यमंत्री यांना उद्देशून अनेकदा बोके, चोर, रिक्षावाला असे शब्द वापरुन अपमानित करुन, त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. तसेच दंगल घडवण्याच्या दृष्टीने दोन गटात भांडणे लावणे, दंगल घडवण्याच्या उद्देशाने वक्तव्य करणे. त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणे, असे बेकायदेशीर वर्तन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विधानांमुळे फिर्यादीच्या भावना दुखावल्या यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.
हे ही वाचा:
चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच
उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर
अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधला. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपावर टीका केली.