मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह पाच जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आणि धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम या चार जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या चौघांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार अनिल परब यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर मध्यरात्री वाकोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिका एच/पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. याच मोर्चादरम्यान ठाकरे गटातल्या काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली होती. याच मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल परब यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक हाजी अलीम शेख, विधानसभा संघटक माजी नगरसेवक सदा परब, उदय दळवी, संतोष कदम या चार जणांना वाकोला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. तर, वाकोला पोलिसांनी इतर फरार आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. कलम ३५३, ३३२, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या रक्कमेत कपात
दिल से बुरा लगता है… फेम देवराज पटेलचे अपघाती निधन; कोण आहे देवराज?
कंपासमधील ब्लेडने दर्शनावर वार नंतर दगडाने मारहाण
“माझी ड्युटी संपली…”, म्हणत वैमानिकाने दिल्लीच्या प्रवाशांना जयपूरलाच सोडलं!
प्रकरण काय?
वांद्रे पूर्व परिसरातील ठाकरे गटाची एक शाखा अनधिकृत असल्याचे कारण देत शाखेवर जेसीबी चालवून कारवाई करण्यात आली होती. शाखेवर कारवाई करताना शाखेतला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवरायांचा फोटो न काढता हातोडा मारल्याने ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखा पाडण्याच्या वेळी उपस्थित अधिकाऱ्याला या प्रकरणात जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण केली.