जम्मू- काश्मिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

जम्मू- काश्मिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असतानाच केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मिर बाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मिर मधील सुरक्षा बलातील सैनिकांचा सन्मान केला जाणार आहे.

केंद्रीय सुरक्षा बलातील सैनिकांच्या सन्मानार्थ जम्मू आणि काश्मिर मधील ७५ शाळा आणि रस्त्यांचे नामकरण तेथे धारातिर्थी पडलेल्या जवानांच्या नावावरून केले जाणार आहे. सीएनएन न्यूज १८ संपादक आदित्य राज कौल यांनी याबाबत ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एका आदेशाचे छायाचित्र जोडले आहे ज्यात, १० जिल्ह्यांच्या मुख्याधिकाऱ्यांना नामकरणासाठी सरकारी शाळा आणि रस्ते निवडण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या आदेशानुसार जिल्हानिहाय एका समितीचे गठन देखील केले जाऊ शकणार आहे. या आदेशानुसार ही यादी अतिरिक्त आयुक्तांकडे ५ ऑगस्टपूर्वी पाठवणे अपेक्षित होते.

हे ही वाचा:

कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार

आदर पुनावाला म्हणून भेटले आरोग्यमंत्र्यांना…

आपात्कालिन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून देखील अर्ज

या राज्यालाही द्या, भारतीय हॉकीच्या यशाचे श्रेय!

जम्मू आणि काश्मिरचे मुख्य सचिव अरुण कुमार मेहता यांनी घोषित केले की सरकार सुमारे ७५ रस्त्यांचे आणि शाळांचे नामकरण करणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजले आहे.

सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना मेहता यांनी सांगितले की, हा अतिशय अभिमानास्पद निर्णय आहे. सैनिकांच्या सन्मानार्थ ७५ रस्ते आणि ७५ शाळांचे नामकरण केले जाणार आहे. या बरोबरच या केंद्रशासित प्रदेशाने स्वतःच्या राज्यगीताला मान्यता मिळावी यासाठी देखील मागणी केली आहे.

Exit mobile version