मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातल्या तीन माजी नगरसेवकांसह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला पुन्हा गळती लागली आहे. ठाकरे गट सोडून शिवसेनेत जाण्याचे कारण नाशिक मधल्या ठाकरे गटाच्या बऱ्याच नेत्यांना बोलण्याची पद्धत नाही. कोणी आमच्या चारित्र्याला धक्का पोचवत असेल तर त्यांच्यासोबत काम करणे आम्हाला शक्य नसल्याचे या महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळेस सांगितले.
पक्ष मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या सभा घेत आहेत. आज मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ठाण्याला हा प्रवेशसोहळा पार पडला. नाशिकहून ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख शशिकांत कोठुळे यांच्यबारोबर माजी नगरसेविका श्यामला दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे , प्रभाकर पाळंदे यांच्यासह शरद देवरे, शोभा गटकाळ, मंगला भास्कर , शोभा मगर, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला आहे.
हे ही वाचा:
लांगुलचालन करत असतील तर उद्धव ठाकरेंना याचं उत्तर बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल
महाराष्ट्राची डरकाळी! जागतिक मानकांच्या व्याघ्र प्रकल्पात नवेगाव, मेळघाट, ताडोबा
खतरनाक आरोपी अतिकला उत्तर प्रदेशला नेणार; उमेश पाल हत्याकांड
आठ वर्षीय मंगोलियन मुलगा होणार तिबेटचा तिसरा धर्मगुरू
नाशिक मधल्या मालेगाव मध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यासाठी ठाकरे गटाच्या नेते, कार्यकर्ते यांची जोरदार तयारी सुरु आहे. आता पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार आहेत. पहिली सभा त्यांनी खेड मध्ये घेऊन दुसरी सभा आज मालेगाव मध्ये होणार आहे. एकीकडे जोरदार सभेची तयारी चालू असताना आता ठाकरे गटाला हे मोठे खिंडार पडले आहे. हा मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. कारण मोठ्या प्रमाणांत महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.