27 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणबंगालमध्ये ९६ जागा ठरणार निर्णायक

बंगालमध्ये ९६ जागा ठरणार निर्णायक

Google News Follow

Related

पश्चिम बंगाल निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला असून, काही एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर रिपब्लिक-सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये थेट भाजपा सत्तेचा सोपान गाठणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी प्रचाराचा जोरदार धुरळा उडवला होता. अनेक जिल्ह्यांत सभा घेऊन तृणमूलवरही जोरदार हल्लाबोल केला होता. त्याचीच परिणती म्हणून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विशेष म्हणजे रिपब्लिक-सीएनएक्सने तर पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचंही म्हटलं. पण निकालाचं खरं चित्र २ मे रोजीच स्पष्ट होणार आहे.

रिपब्लिक-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपा सत्तेत येऊ शकते. एक्झिट पोलनुसार भाजपाला १३८ ते १४८ जागा मिळू शकतात. टीएमसीला १२६ ते १३६ जागा मिळू शकतात. कॉंग्रेस-डाव्या आघाडीला ६ ते ९ जागा आणि इतरांना १ ते ३ जागा मिळू शकतात. रिपब्लिक-सीएनएक्स हा एक्झिट पोल देशात चर्चेचा विषय ठरत आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’

माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

कोरोनाच्या पार्शवभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

‘या’ शोएबने घेतली अरविंद केजरीवालांची विकेट

सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार ९६ जागा आहेत, ज्यावर विजय किंवा पराभव निश्चित होईल. अशा परिस्थितीत या जागांवर विजय मिळणाऱ्या पक्षाला बंगालची सत्ता मिळणार आहे. सी वोटरचे म्हणणे आहे की, या ९६ जागांपैकी ५५ जागा भाजपा जिंकण्याचा अंदाज आहे, टीएमसी ३९ आणि इतर ६ जागा आहेत. यातील निम्म्या जागा भाजपाने जिंकल्या तर पश्चिम बंगालमध्ये प्रथमच त्याचे सरकार असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा