बृहन्मुम्बई महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी प्रिमॅट्रिक शिष्यवृत्तीचे फॉर्म शिक्षक व मुख्याध्यापक भरून घेतात. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शासनकडून शिष्यवृत्तीही मिळवून देतात. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त शिक्षणाधिकारी श्री राजू आमिर तडवी, यानी १५ सप्टेंबर २०२१ रोजी पी.पी.ओ./ओ.डी./१४५ या क्रमांकाचे परिपत्रक काढुन ही परंपरा मोडीत काढली आहे.
या परिपत्रकात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रिमॅट्रिक शिष्यवृत्ती कामकाजाकरिता सहा अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे या सहा अधिकाऱ्यांपैकी पांच अधिकारी मुस्लिम आहे. तसेच शिष्यवृत्ति कामकाजाबाबत संबंधित शालेय मुख्याध्यापकांना याबाबतचे कामकाज पार पडण्याकरता तांत्रिक बाब उदभवल्यास मार्गदर्शनकरिता दोन मुख्याध्यापक, दोन लिपिक आणि एक प्रशिक्षक यांचीही नेमणुक करण्यात आली आहे. तांत्रिक मार्गदर्शनासाठी नेमलेले चारही कर्मचारी मुस्लिम आहे. नवनियुक्त शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या या परिपत्रकामुळे शिक्षणविभागत तीव्र नाराजी पसरलेली आहे. दहा पैकी नउ नियुक्त्या मुस्लिम अधिकाऱ्यांची केल्यामुळे नवनियुक्त शिक्षणाधिकारी राजू आमिर तड़वी हे उघड उघड सांप्रदायिक भेदभाव करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या नवीन शिक्षणाधिकाऱ्यांना मुस्लिम अधिकाऱ्यांवरच विश्वास असल्याचीही चर्चा आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे हेच मराठी प्रेम का ?
१० पैकी ९ नियुक्त अधिकारी , मार्गदर्शकांचे नाव एकदा वाचून बघा ..
कोणाच्या सांगण्यावरून ह्या नेमणूका करण्यात आल्या ?
सत्ताधारी @ShivSena चे नक्की काय धोरण आहे ? pic.twitter.com/bhoRS7v5Kj
— Pratik Karpe (@CAPratikKarpe) September 28, 2021
मुंबई भाजपचे नेते प्रतिक करपे यांनी या ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे हेच मराठी प्रेम आहे का? १० पैकी ९ नियुक्त अधिकारी, मार्गदर्शकांचे नाव एकदा वाचून बघा. कोणाच्या सांगण्यावरून ह्या नेमणूका करण्यात आल्या? सत्ताधारी शिवसेनेचे नक्की काय धोरण आहे?” असा सवालही त्यांनी केला आहे.
हे ही वाचा:
…अखेर ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड इतिहासजमा