तृणमुलच्या गुंडांचे क्रौर्य, ८५ वर्षांच्या वृद्धेलाही मारले

तृणमुलच्या गुंडांचे क्रौर्य, ८५ वर्षांच्या वृद्धेलाही मारले

पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांना प्रत्यक्ष सुरूवात होण्यापूर्वीच भाजपाच्या एका कार्यकर्त्याच्या घरावर तृणमुल काँग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात या कार्यकर्त्याच्या आईला देखील मारहाण करण्यात आली होती. आज त्यांचे निधन झाले आहे.

भाजपा नेता गोपाल मजूमदार यांच्या ८५ वर्षांच्या मातोश्री शोवा मजूमदार यांच्यावर तृणमुल काँग्रेसकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यांना २५ तारखेला रुग्णालयातून सोडण्यात आलं होतं, परंतू चारच दिवसांनी आज त्यांचा मृत्यु झाला.

हे ही वाचा:

पोटदुखीमुळे शरद पवार रुग्णालयात

भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल

बंगालमध्ये ममतांच्या ‘भद्रलोक’चा कहर

…अखेर जहाज तरंगू लागले!!

शोवा मजूमदार यांच्यावर २७ फेब्रुवारी रोजी हल्ला करण्यात आला होता. यावेळेला त्यांना जमिनीवर पाडण्यात आलं आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले. यावेळी हल्लेखोरांनी त्यांना तोंड बंद ठेवण्याची धमकी देखील दिली होती.

या हल्लेखोरांविरूद्ध गोपाल आणि त्यांच्या आईने केलेल्या तक्रारींच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आली होती.

या घटनेनंतर सोशल मिडीयावर शोवा यांच्या मृत्युवरून जोरदार राग व्यक्त केला जात हे. हे बंगालसाठी लाजिरवाणे कृत्य असल्याचे म्हटले जात आहे. ‘बंगालची ही एक मुलगी मारली गेली’ अशा प्रकारची भावना व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या मृत्युबद्दल राग व्यक्त करताना, भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट केले आहे की, ‘बंगालची ही मुलगी, जी कोणाची तरी बहिण होती, मता होती…मरण पावली आहे. त्यांच्यावर तृणमुल काँग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला परंतु ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यासाठी सहानुभूती दर्शक एक शब्द नाही काढला. त्यांच्या जखमांवर फुंकर कोण घालेल? तृणमुलच्या राजकारणाने बंगालचा आत्माच ठेचला आहे.’

या बरोबरच केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शोवा मजुमदार यांच्या मृत्युनिमित्त शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करताना शोवा मजुमदार यांच्या मृत्युचा धक्का बसल्याचे सांगितले आहे. त्याबरोबरच ‘या परिवाराचे दुःख ममता दीदींना दीर्घकाळ छळणार आहे’, असेही ते म्हणाले आहेत. ‘बंगाल हिंसाचार मुक्त उद्यासाठी लढा देईल, बंगाल आपल्या माता भगिनींच्या सुरक्षित राज्यासाठी लढा देईल’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version