महाराष्ट्र कोविड रुग्णवाढीत अव्वल

महाराष्ट्र कोविड रुग्णवाढीत अव्वल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांची यादी तयार केली. यापैकी सर्वाधिक रुग्ण संख्या असलेले आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. केवळ बंगळूरू शहर आणि एर्नाकुलम हे महाराष्ट्राबाहेरील जिल्हे आहेत.

अनेक महिन्यांनंतर पुन्हा एकदा भारताची रुग्णवाढ चिंताजनक पातळीपर्यंत वाढली आहे. जवळपास तीन महिन्यांनी भारतात एका दिवशी २३,००० रुग्णांची नोंद झाली आहे. यापुर्वी २४ तासात २३,००० रुग्ण २४ डिसेंबर २०२० रोजी आढळले होते.

सध्या देशभरात महाराष्ट्रात कोविडचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ पंजाबचा क्रमांक लागतो. गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश यांतही हळूहळू रुग्णवाढ नोंदली जात आहे.

हे ही वाचा:

भारताच्या कोविड-१९ केसेसपैकी पन्नास टक्क्याहून जास्त केसेस ‘या’ राज्यातून

‘भ्रष्टाचाराचा कोविड’ ही पुस्तिका भाजपा कडून प्रकाशित

या यादीत सर्वाधिक सक्रिय रुग्णांसह (१८,४७४) पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागला आहे. त्याखालोखाल नागपूर (१२,७२४), ठाणे (१०,४६०), मुंबई (९,९७३), बंगळूरू शहरी (५,५२६), एर्नाकुलम (५,४३०), अमरावती (५,२५९), जळगाव (५,०२९), नाशिक (४,५२५) आणि औरंगाबाद (४,३५४) या जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे.

निती आयोगाचे सदस्य असलेले विनोद पॉल यांनी देखील महाराष्ट्रातील कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी कोविड प्रसार आणि कोरोनाबाबत घ्यायची खबरदारी हलक्यात घेऊ नये अशी सुचना केली होती.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील कोविडची स्थिती चिंताजनक

बेस्ट सीएमची सुमार कामगिरी

वैद्यकीय तज्ञांनी सध्याची वाढ कोविडच्या नव्या आवृत्तीमुळे नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्यामते या वाढीचा आणि कोविडच्या नव्या आवृत्तीचा संबंध नाही. लोकांच्या निष्काळजीपणामुळे आणि पुन्हा एकदा रेल्वे चालू केल्यामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सप्टेंबर पासून फेब्रुवारीच्या सुरूवातीच्या कालावधीपर्यंत या राज्यातील रुग्णसंख्येत घट होत होती. मात्र पुन्हा एकदा रुग्णवाढ होत आहे.

 

Exit mobile version