मुद्रा योजनेची सात वर्ष! १८.६० लाख कोटी रुपयांची कर्ज वितरित

मुद्रा योजनेची सात वर्ष! १८.६० लाख कोटी रुपयांची कर्ज वितरित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेला सात वर्ष पूर्ण होत आहेत. ७ वर्षांच्या काळात या योजनेच्या माध्यमातून अनेक गरजूंना कर्ज पुरवठा करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली. या योजनेच्या अंतर्गत गेल्या ७ वर्षांत तब्बल ३४.४२ कोटी कर्जे देण्यात आली आहेत. तर या कर्जाची एकूण रक्कम १८.६० लाख कोटी इतकी आहे.

२०१५ साली ८ एप्रिलच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या योजनेला प्रारंभ झाला. बिगर कॉर्पोरेट क्षेत्रातील अकृषक प्रकारच्या लघु आणि सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पुरविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेचा ७ वा वर्धापन दिन साजरा होत असताना आज केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी या यजनेच्या यशाचे कौतुक केले आहे.

हे ही वाचा:

आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

UNHRC मधून रशिया निलंबित

इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार

यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

“या योजनेने विशेषकरून लहान उद्योगांसाठी सक्षम वातावरण निर्मिती करण्यात सहाय्य केले आहे आणि अत्यंत मुलभूत पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण करायला मदत केली आहे.या योजनेतून दिल्या गेलेल्या एकूण कर्जांपैकी 68%कर्जे महिलांना दिली आहेत आणि 22% कर्जे,मुद्रा योजना सुरु झाल्यापासून कोणतेही कर्ज न घेतलेल्या नव्या उद्योजकांना देण्यात आली आहेत.

मुद्रा योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करून आणि त्यांना शुभेच्छा देऊन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कर्ज घेण्याचा विचार करत असलेल्यांना पुढे येऊन या राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची विनंती केली. केंद्रीय मंत्री सीतारामन म्हणाल्या, “पंतप्रधान मुद्रा योजनेतून दिल्या गेलेल्या एकूण कर्जांपैकी 51%कर्जे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत त्यामुळे ही योजना कृतीशील सामाजिक न्यायासाठीची योजना असून पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेच्या खऱ्या प्रेरणेचे मूर्तिमंत रूप आहे.” असे अर्थमंत्री म्हणाल्या.

Exit mobile version