जम्मू काश्मिरातले ६४ काँग्रेस कार्यकर्ते ‘आझाद’

जम्मू काश्मिरातले ६४ काँग्रेस कार्यकर्ते ‘आझाद’

काँग्रेस पक्षाला जम्मू आणि काश्मीरमध्ये गळती लागली असून काँग्रेस नेत्यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह जम्मू- काश्मीरमधील तब्बल ६४ नेत्यांनी पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर जम्मू- काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याचं चित्र आहे.

काँग्रेसच्या ६४ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा दिला आहे. तारा चंद, चौधरी घारू राम, डॉ मनोहर लाल शर्मा, माजीद वाणी, ठाकूर बलवान सिंह आणि विनोद मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. या सर्व ६४ नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

“दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं काय आहे?”

एकनाथ शिंदे यांच्यामुळे मेट्रो धावणार आहे

चित्रदुर्ग मठाच्या पुजाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप

वरळी नाक्याच्या बाप्पाचा रथ खेचला मुस्लिम बांधवांनी

“सर्वांनी माझ्यासाठी राजीनामा दिला आहे. सर्वजण माझ्यासोबत आहेत. काँग्रेसला भविष्यात आणखी अनेक धक्के बसतील,” असा गौप्यस्फोट गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. राजीनामा देताना त्यांनी राहुल गांधी आणि एकूणच काँग्रेसच्या कारभारावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार असून त्यापूर्वीच काँग्रेसमधून वरिष्ठ नेते राजीनामा देत आहेत त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

Exit mobile version